आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राच्या पत्नीसोबतची सेक्स टेप झाली होती उघड, आता जिंकली 760 कोटींची केस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हीदर क्लेम आणि हल्क होगन. या दोघांचाच टेप लीक झाला होता. - Divya Marathi
हीदर क्लेम आणि हल्क होगन. या दोघांचाच टेप लीक झाला होता.
सेंट पीटर्सबर्ग- फ्लोरिडातील एका कोर्टाने शुक्रवारी एक्स रेसलर हल्क होगनच्या लीक झालेल्या सेक्स टेप प्रकरणाचा निकाल आला आहे. गॉकर मीडिया वेबसाईटला त्यांच्या खासगी आयुष्यात दखल दिल्याप्रकरणी दोषी मानत 115 मिलियन डॉलर (सुमारे 760 कोटी रूपये) देण्याचे आदेश दिले आहेत. वेबसाईटने एप्रिल 2012 मध्ये हल्क होगन आणि त्याच्या मित्राची पत्नी हीदर क्लेम यांची सेक्स टेप ऑनलाईन केले होते.
निर्णय लागताच कोर्ट रूममध्येच रडायला लागले हल्क होगन...
- कोर्टात सहा तासांच्या युक्तिवादानंतर ज्यूरींनी हल्क होगन (टेरी जीन बोलिआ) यांना मानसिक त्रास झाल्याबद्दल 60 मिलियन डॉलर आणि आर्थिक नुकसानीसाठी 55 मिलियन डॉलर देण्यात यावे असे सांगितले.
- होगनचे अटॉर्नी डेविड ह्यूस्टन यांनी सांगितले की, ही अशा प्रत्येक व्यक्तीचा विजय आहे ज्यांच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करून बदनाम केले.
- कोर्टाचा निर्णय ऐकताच हल्क होगन कोर्टरूममध्ये रडायला लागला तसेच आपल्या वकिलांच्या गळ्यात पडला.
- गॉकर मीडियाचे संस्थापक निक डेंटन यांनी म्हटले आहे की, या निर्णयाच्याविरोधात वरच्या कोर्टात जावू.
- गॉकरचा दावा आहे की, हल्क पब्लिक फिगर आहे. त्यामुळे त्यांची टेप पोस्ट करणे हा निर्णय यूएस लॉच्या फर्स्ट एमेंडमेंटच्या अंतर्गत येतो.
- होगनने गॉसिप आणि मीडिया रिपोर्टिंग करणा-या या वेबसाईटविरोधात 100 मिलियन डॉलरचा दावा ठोकला होता.
- सुनावणीदरम्यान दोन पुरुषांच्या आणि चार महिलांच्या ज्युरींनी मान्य केले की, होगनच्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ केली आहे व त्याचे नुकसान झाले आहे.
- हा व्हिडिओ सुमारे 10 वर्षापूर्वीचा होता. हल्कच्या माहितीनुसार, आपला मित्र टॉड एलेन क्लेमच्या घरी त्याच्या पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवतानाच व्हिडिओ बनवला होता. मात्र, त्याची माहिती नव्हती.
- होगनने सांगितले की, अनेक वर्षानंतर लीक झालेल्या व्हिडिओमुळे माझी बदनामी झाली व मी लज्जित झालो. हा व्हिडिओ लोकांनी या वेबसाईटवर 2.5 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला.
काय आहे प्रकरण-
- न्यूयॉर्क स्थित या वेबसाईटने 4 ऑक्टोबर 2012 रोजी हल्क होगन आणि त्याच्या मित्राची पत्नी हीदर क्लेम हिचा सेक्स टेप ऑनलाईन प्रसिद्ध केला.
- एक मिनट 41 सेकंदाचा हा व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केला होता. हा व्हिडिओ एकून 30 मिनिटांचा होता.
- 15 ऑक्टोबर 2012 रोजी होगनने हीदर आणि त्याच्या पत्नीविरोधात खासगी आयुष्याला धक्का पोहचवल्याचे सांगत गुन्हा दाखल केला. हीदरने जाहीर माफी मागितल्यानंतर या दोघांत सेटलमेंट झाली.
कोण आहे हल्क होगन?
- हल्क होगनचे खरे नाव टेरी जीन बोलिआ आहे. तो एक प्रोफेशनल अॅक्टर, टेलीविजन पर्सनॅलिटी आणि आंत्रप्रेन्योर आहे.
- 1980 आणि 90 च्या दशकात टेरी जीनची लोकप्रियता हल्कच्या नावाने WWF (आज WWE)मध्ये अव्वल होती.
- तो WWF आणि WCW वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिपमध्ये 12 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलाय.
- 1990 आणि 1991 मध्ये सलग रॉयल रम्बल जिंकणारा तो एकमात्र रेसलर ठरला होता.
- 2005 मध्ये हल्कला WWE हॉल ऑफ फेममध्ये सामील केले गेले.
- 2009 ते 2013 पर्यंत तो टीएनए फाईटमध्ये ऑन स्क्रीन जनरल मॅनेजर होता. कधी कधी रेसलिंग सुद्धा करायचा.
- 24 जुलै 2015 रोजी वर्णभेदाची टिप्पणी केल्याप्रकरणी वर्ल्ड रेसलिंग एंटरटेन्मेंटने हल्क होगनसोबतचा करार संपवला होता. यानंतर WWE च्या वेबसाईटवरून होगनचे प्रोफाईल पेज डिलीट करण्यात आले. होगने 1977 मध्ये रेसलिंगला सुरुवात केली होती.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...