आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरीराचा प्रत्येक भाग जवळपास प्लास्टिकचाच, यामुळे आलाय भारतात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - चालते फिरते ह्युमन डॉल बनण्यासाठी असंख्य कॉस्मेटिक सर्जरी करणारा रॉड्रिगो आल्व्स सध्या भारतात आला आहे. शरीराचा प्रत्येक भाग प्लास्टिकचा बनवणारा ह्युमन डॉल भारतात प्लास्टिक सर्जरीसाठी आलेला नाही. त्याला बॉलिवुडच्या एका चित्रपटात रोल मिळाला आहे. त्याच्याच चित्रीकरणासाठी तो भारतात आला आहे. रॉड्रिगोने सांगितल्याप्रमाणे, भारतात तो खास शूटिंगसाठी आला होता. मात्र, येथे राहून त्याचे दारुचे व्यसन देखील कमी झाले आहे. 

 

- ह्युमन डॉल नावाने इंस्टाग्राम आणि इंटरनेट प्रसिद्ध असलेला रॉड्रिगो याने भारतातील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 
- यात तो विविध धार्मिक स्थळांना भेट देत असल्याचे दिसून येते. या व्यतिरिक्त तो काही फोटोजमध्ये योगा करताना आणि स्विमिंग करताना देखील दिसला. 
- भारतातील धार्मिक वातावरण पाहून त्याने आपली दारुचे व्यसन सुटल्याचा दावा केला. गेल्या 14 दिवसांपासून तो भारतात आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्याने मद्याला हातही लावला नाही. भारतात आपले आयुष्य बदलल्याचे तो सांगत आहे. 
- येथे एका चित्रपटात त्याला डेनमार्कच्या राजकुमाराची भूमिका मिळाली आहे.  
- ब्राझीलच्या रॉड्रिगोने आपल्या सर्जरीजवर आतापर्यंत 4 कोटींची उधळपट्टी केली आहे. काही दिवसांपूर्वीच आपले नाक फाटल्याने तो चर्चेत आला होता. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, त्याचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...