आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Human Smuggling In Turkey. Read More News At Divyamrathi.com

मानवी संकट: युरोपीय देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर माणसांची तस्करी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायमन शूस्टर/ बोड्रम, तुर्की- तुर्कीच्या पश्चिमेकडील समुद्रकिनाऱ्यावरील कॅप्टन कादिर यांच्या हॉटेलमधील मुले साफ-सफाई करण्यात मग्न असताना त्यांना समुद्रातून कोणीतरी ओरडण्याचे स्वर ऐकू आले. ऑगस्टच्या अंधाऱ्या रात्री आवाज कोठून येतो हे कळत नव्हते. मात्र, हॉटेलचे मालक कादरी गुनेर यांना या प्रकरणाची माहिती होती. किनाऱ्याजवळ निर्वासितांची आणखी एक नाव बुडाली होती. किनाऱ्यावर उभे असलेले तस्कर अापले ग्राहक पाण्यात बुडताना पाहत होते. काही आठवड्यांनंतर गुनेरने घटनेची आठवण काढली. नाव बुडाली की वाचली याच्याशी तस्करांना काहीच घेणेदेणे नव्हते. कारण, त्यांना त्यांचे पैसे मिळाले होते. पोलिसांनीही त्यांचा हिस्सा घेतला होता.

गुनेरने गेल्या काही महिन्यांमध्ये तुर्कीच्या बोड्रम प्रायद्वीपवर फेनेर किनाऱ्याच्या जवळ सव्वातीन किलोमीटर लांब भागाला जगातील सर्वात मोठ्या निर्वासितांच्या केंद्राच्या रूपात बदलत असल्याचे पाहिले आहे. भौगोलिक स्थिती याचे महत्त्वाचे कारण आहे. तेथून युरोपचा भूभाग- ग्रीसचा कोस द्वीप जवळपास आठ किमी दूर आहे. साधारण मोटरबोटव्दारेही तेथे तासाभरात पोहोचता येते. यंदा आतापर्यंत तीन लाख ९० हजार निर्वासित नावेव्दारे ग्रीसला पोहोचलेे. फक्त सप्टेंबरमध्ये एक लाख ५३ हजारांपेक्षा जास्त व्यक्ती येथे पोहोचल्या.
सप्टेंबरच्या सुरुवातीला तीन वर्षीय सीरियाई मुलगा अॅलन कुर्दीचा मृतदेह फेरेन समुद्रकिनारी आढळल्याने जगभर त्याची चर्चा झाली. गेल्या पाच वर्षांत सीरियाई निर्वासितांवर जवळपास ३८५ अब्ज रुपये खर्च करणाऱ्या तुर्की सरकारला निर्वासितांना युरोपमध्ये पाठवणाऱ्या तस्करांना थांबवण्यात कुठलाही रस नाही. तसे, सरकार तस्करीच्या उद्योगाला पाठबळ देण्यासंदर्भात नकार देत आहे. ग्रीसमधील तुर्कीचे राजदूत करीम उरास म्हणतात, तुर्कीने यंदा ४० हजार निर्वासितांना समुद्रामध्ये वाचवले आहे. ८६ तस्करांना अटक केली आहे.

सर्वाधिक फायदा
समुद्र पार करण्यासाठी प्रौढ निर्वासितांना ७८ हजार रुपये द्यावे लागतात. ऑगस्टमध्ये ६४ हजार रुपये लागतात. मुलांसाठी अर्धे पैसे द्यावे लागतात. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जवळपास १०० नौका दररोज तुर्कीतून ग्रीसमध्ये गेल्या. प्रत्येक नावेत ४० पेक्षा जास्त लोक होते. सुमारे ३२ कोटी रुपये दिवसाचे उत्पन्न गुन्हेगारांना तस्करीच्या व्यवसायात ओढण्यासाठी खूप आहे. युरोपियन युनियनमधील मानवी तस्करीविरोधी अभियानाच्या प्रमुख समन्वयक मिरिया वसिलियाडाऊ म्हणतात, निर्वासितांच्या तस्करीत फार फायदा आहे. त्यांचा अंदाज आहे की ही आंतरराष्ट्रीय इंडस्ट्री अब्जावधी रुपयांची आहे.

>७८,०००रु तुर्की ते ग्रीस या आठ किमीच्या जलप्रवासासाठी तस्कर दरडोई ७८ हजार रुपये घेतात. ३०,००० यूरोपोलनुसार निर्वासित युरोप पोहोचण्याच्या कामांत सुमारे ३०,००० लोक सामिल आहेत.