आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 वर्षांनंतरचे जग, समुद्रात राहतील लोक, मंगळावर एन्जॉय करतील सुट्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भविष्यात समुद्रात अशा बबल सिटीज असतील. - Divya Marathi
भविष्यात समुद्रात अशा बबल सिटीज असतील.
न्युयॉर्क (अमेरिका)- काही शतकांमध्ये मानवाचे जीवन समुळ बदलणार आहे. तो केवळ पाण्यात घरे बांधणार नाही तर सुट्याही चंद्र, मंगळ यांच्यासह इतर ग्रहांवर एन्जॉय करेल. 'स्मार्टथिंग्स फ्यूचर लिव्हिंग' नावाच्या एका रिपोर्टमध्ये 100 वर्षांनी पृथ्वीवरील जीवन कसे असेल याची भविष्यवाणी करण्यात आली आहे.
समुद्रात असतील बबल सिटीज
- 2116 मध्ये जवळपास सर्वच इमारती हायराईज असतील.
- पाण्याच्या आत विशाल 'बबल सिटी' राहिल. बबलच्या आत बहुमजली इमारती, शाळा, ऑफिस आणि पार्क राहतील.
- समुद्राच्या पाण्यापासून ऑक्सिजन निर्मिती केली जाईल.
ट्रॅव्हलिंगसाठी राहतील खासगी ड्रोन
- 100 वर्षांनी बहुसंख्य लोकांमध्ये खासगी ड्रोन असतील. बाहेर फिरायला जाताना घराला सोबत घेता येईल.
- मंगळ आणि चंद्र जवळ भासू लागेल. लोक सुट्या एन्जॉय करण्यासाठी तेथे जातील.
- लहान-मोठ्या आजारांसाठी हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नसेल. घरीत मशीन तपासणी आणि उपचार करतील.
- फर्निचरपासून जेवणापर्यंत सर्वकाही अॅडव्हान्स थ्रीडी प्रिंटरमध्ये तयार केले जाईल.
- दररोज ऑफिसमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. घरी बसुन काम करता येईल.
- मानवांना जमिन कमी पडेल. त्यामुळे समुद्रात घरे तयार केली जातील.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, फ्युचर लिव्हिंगचे ग्राफिक्स....