आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Did Parallel Universe Open Up? Hundreds See \'floating City\' Filmed In Skies Above China

VIDEO : चीनमध्‍ये दिसले उडत असलेले शहर, तर्क विर्तकांना उधाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍ह‍िडिओ पाहण्‍यासाठी वर क्लिक करा - Divya Marathi
व्‍ह‍िडिओ पाहण्‍यासाठी वर क्लिक करा
बीजिंग - चीनमध्‍ये हजारो लोकांनी उडते शहर पाहिल्‍याचा दावा केला आहे. सुरुवातीला गुआनदोंग परिसरात नंतर जियानगक्सी येथे आकाशात उडत असलेले शहर दिसले. एवढेच नाही तर अनेकांनी या शहराचे फोटो आणि व्‍ह‍िडिओ घेतले. यामध्‍ये ढगांमधून इमारती जात असल्‍याचे दिसत आहे, असे वृत्‍त चाइनीज टीव्‍ही न्यूजने दिले आहे.

का झाले असे?
> हे समांतर विश्‍व (पॅरलल यूनिव्‍हर्स) असल्‍याचा दावा अनेकांनी केला आहे.
> हवामान तज्‍ज्ञ आणि संशोधकांनी याला 'फाटा मोरगाना' नाव देत याला दृष्‍टी भ्रम म्‍हटले.
> हवामान तज्‍ज्ञांनी सांगितले की, फाटा मोरगाना जमीन किंवा समुद्रात दिसतो. यात ऑप्टिकल डिस्ट्रोशन आणि ऑब्जेक्ट्स दिसतात.
> उष्‍णतेमुळे वेगवेगळ्या तापमानाने हवा आरपार होऊन रे ऑफ लाइट बेंड होते. त्‍यामुळे आकाशात प्रतिकृती बनते.
दावा करणाऱ्यांनी काय म्‍हटले ?
> यूट्यूब चॅनल Paranormal Crucible ने आपल्‍या व्‍ह‍िडियो वृत्‍तात म्‍हटले, '' स्‍थानिक नागरिकांनी जे चित्रिकरण केले त्‍यात ढगांच्‍या मध्‍ये उडते शहर दिसत होते. काहीच वेळात ते गायब झाले.
> हा 'प्रोजेक्ट ब्लू बीम टेस्ट' चा परिणाम असल्‍याची शक्‍यताही या चॅनलने व्‍यक्‍त केली.
> एक दिवस परग्रहावरील व्‍यक्‍ती पृथ्‍वीवर हल्‍ला करतील किंवा ख्रिश्‍चन मसिहा पुन्‍हा जगात येईल, हा भ्रम पसवण्‍यासाठी 'नासा'ची खेळी आहे. त्‍यालाच चिनमध्‍ये प्रोजेक्ट ब्लू बीम एक
प्रोलिफिक कंस्पेरेसी सिद्धांत म्‍हणतात.
> प्रचार सिद्धांतावर विश्‍वास असलेल्‍या सेरगे मोनास्ट यांनी 1980 मध्‍ये या गोष्‍टीचा दावा केला की, नासा आपल्‍या प्रोजेक्टला वर्ष 2000 पर्यंत पूर्ण करेल. त्‍याची सुरुवात 1983 मध्‍ये झाली होती. नंतर त्‍याला 1996 मध्‍ये शिफ्ट केले गेले.
> काही वृत्‍तपत्रांनी असाही दावा केला आहे की, आपली तांत्रिक शक्‍तीची चाचणी करण्‍यासाठी चीन सीक्रेटली होलोग्रॅफिकने हे सर्व केले असावे.
यापूर्वीसुद्धा घडली होती अशी घटना
> वेबसाइट The Inquisitr च्‍या वृत्‍तानुसार, मार्च 2011 मध्‍ये नार्दन नायजेरियामधील बउची राज्‍यातील दुलाली गावातील शेकडो ग्रामस्‍थांनी असाच प्रकार पाहिला होता.
> 2011 मध्‍ये चीनमध्‍येसुद्धा असेच काहीच दिसले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज...