आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुकेने व्याकूळ मूल, पोलिसाकडून स्तनपान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुनुयान (अर्जेंटिना) - अर्जेंटिनामधील महिला पोलिस अधिकारी सध्या चर्चेत आहे. कार्यालयातील कामासाठी ती चर्चेत नसून तिने एका परक्या मुलाला आईची कुस दिली. सिल्व्हियाना रोजस हिने चार महिन्यांच्या मुलाला स्तनपान दिले. या मुलाची आई घर सोडून गेली होती. भुकेने ते अाकांत करत होते.

या महिलेचे पती व सासऱ्याशी वाद झाले. त्यामुळे रागाने ती घर सोडून निघून गेली. आईविना मूल भुकेने व्याकूळ झाले. पित्याला काही सुचत नव्हते. त्यांनी मुलाला आपल्या पद्धतीने काही भरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही यशस्वी झाला नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिस स्थानकाकडे मदतीसाठी धाव घेतली.
पोलिस अधिकारी सिल्व्हिया जेव्हा त्या घरात पोहोचली तेव्हा ते मूल रडत होते. रोजस यांनादेखील ८ महिन्यांचे मूल आहे. त्यांनी त्वरित त्या मुलाला स्तनपान दिले. ४ महिन्यांच्या मुलाची रडारड कशासाठी होती, हे त्यांना चटकन ध्यानात आले. मूल त्यानंतर शांतपणे खेळू लागले. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांकडून काही स्वच्छ कपडे मागवले. मुलाला स्वच्छ करून नवे कपडे चढवले. त्याला पुन्हा स्तनपान केले. त्यानंतर मूल शांतपणे झोपले. पोट भरल्यामुळे त्याला झोप लागली. सिल्व्हियाने सांगितले की, आपण त्या घरात पोहोचताच मूल रडत असल्याचे पाहिले. आपण पोलिस अधिकारी आहोत. मात्र, त्या आधी आई आहोत. त्यामुळे आईचे कर्तव्य मी पार पाडले.

मुलांना स्वच्छ राहणे आवडते. त्यामुळे मी त्याला खाऊ-पिऊ घालून स्वच्छ केले. या कामात स्टाफनेही मदत केली. स्टाफने संपूर्ण सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले. बालकाच्या आईलाही तिची चूक उमजली. काही तासातच ती परतली. काहीही वाद झाले तरी मूल एकटे सोडू नकोस असे आपण तिला समजावून सांगितले. दक्षतेचा उपाय म्हणून सिल्व्हिया यांनी चाइल्ड लाइनला सूचना दिली होती. त्यामुळे आता हे प्रकरण त्यांच्याकडे आहे. ते चौकशी करून तिला योग्य ती शिक्षा देतील.