आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार स्वागत : हरणाची शिकार करताना बिबटे जीपमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केनियाच्या मसाई मारा राष्ट्रीय उद्यानात हजारो पर्यटक बिबटे, वाघासह इतर अनेक प्राणी पाहण्यासाठी येतात. परंतु प्रत्येक व्यक्ती नशिबवान नसतो. बिबट्यांचा कळप हरणांची शिकार करत असताना गाईडने जीप थांबवली. गाडी पाहून बिबटे जीपच्या छतावर चढले. एक बिबट्या मागील सीटवर जाऊन बसला. हा प्रकार जीपमधील पर्यटकांना घाम फोडणारा होता. ते सर्व अर्थातच घाबरले. परंतु काही क्षणातच ते शांत झाले. त्यांनी बिबट्याचे फोटोही घेतले. थोडा फेरफटका मारल्यानंतर बिबट्याचे हे कुटुंब कोणाला काही दुखापत न करता परत गेले. पर्यटकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला. फोटोग्राफर डेव्हिड होर्स यांनी कॅमेराबद्ध केले.
बातम्या आणखी आहेत...