Home »International »Other Country» Hurricane Irma Has Destroyed Millions Of Homes In Florida

अमेरिका व कॅरेबियन बेटांना असे उद्धवस्त केले चक्रीवादळाने, पाहा PHOTOS

दिव्यमराठी वेब टीम | Sep 13, 2017, 17:46 PM IST

  • इर्मा चक्रीवादळ कॅरेबियन बेटांवरून 200 किमी प्रतितासी वेगाने फ्लोरिडात धडकले होते.
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेतील फ्लोरिडामधून इर्मा चक्रीवादळ गेल्यानंतर तेथील नुकसानीचे चित्र पुढे येऊ लागले आहे. मदत आणि बचाव कार्यासोबतच नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरु झाले आहे. कॅरेबियन बेटांवर राडा घातल्यानंतर इर्मा चक्रीवादळ रविवारी फ्लोरिडा कीजला धडकले होते. यानंतर फ्लोरिडातील अनेक शहरे या वादळ्याच्या तडाख्यात सापडली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या काळात हजारों वीज खांब पडल्याने सुमारे दीड कोटी घरे अंधारात बुडाली होती. पाण्याचा पुरवठा बंद होता. ही स्थिती पुढील काही दिवस अशीच राहण्याची शक्यता आहे. ज्या भागात कमी नुकसान झाले आहे तेथे लोकांना परत जाण्यास अनुमती देण्यात येत आहे. 60 लाख लोकांना हलवले होते सुरक्षितस्थळी....
- फ्लोरिडात सोमवारी हवाई पाहणी केल्यानंतर फ्लोरिडाचे गव्हर्नर रिक स्कॉट यांनी म्हटले की, ‘हे विनाशकारी आहे.’
- मदत आणि बचाव कार्यासाठी नौसेनेचे एक विमानवाहक जहाज पोहचेल. गव्हर्नरनी सांगितले की, मोबाईल घर आणि किना-यावर नौका नष्ट झाल्या आहेत.
- आताच सांगणे कठीण आहे की, नुकसानीचा आकडा काय असेल पण या भागातील सुमारे एक तृतीशं लोक म्हणजेच 1.3 कोटी लोक वीजेशिवाय राहत आहेत. फ्लोरिडात सर्वत्र इर्मा वादळाचा फटका बसला आहे.
- वादळामुळे फ्लोरिडात सहा, जार्जियात तीन आणि साउथ कॅरोलिनात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. वादळाचा धोका पाहता फ्लोरिडातील सुमारे 60 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवले होते.
200 प्रतितासी वेगाने धडकले होते वादळ-
- इर्मा चक्रीवादळ कॅरेबियन बेटांवरून 200 किमी प्रतितासी वेगाने फ्लोरिडात धडकले होते.
- बारबुडा, एंटीगुआ, सेंट मार्टिन, प्यूटरे रिको सारख्या छोट्या बेटांवरील 90% बांधकामे नष्ट झाली आहेत.
- क्यूबा आणि हैतीत महापूराची स्थिती आहे. इंकी रिसर्चच्या माहितीनुसार, अमेरिका आणि कॅरेबियन देशांचे 8 लाख कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.
- फ्लोरिडात ज्या शहरांत वादळ धडकले तेथे अजूनही थांबून थांबून पाऊस पडत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, अमेरिका व कॅरेबियन बेटांना उद्धवस्त केलेले फोटोज...

Next Article

Recommended