आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रीवादळ इर्मा फ्लोरिडात धडकले, सेंट मार्टिनमधून 60 भारतीयांना हलवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मियामी- कॅरेबियन बेटांना तडाखा देणारे इर्मा चक्रीवादळ रविवारी फ्लोरिडात धडकले. श्रेणी-४ असलेल्या वादळामुळे वारे ताशी २०९ किलो मीटर वेगाने वाहू लागले आहे. कॅरेबियन बेटांवर थैमान घातलेल्या वादळाचा धोका लक्षात घेऊन गेल्या दोन दिवसांपासून फ्लोरिडा व परिसरातील नागरिकांनी स्थलांतर सुरू केले होते. सेंट मार्टिन बेटावरून ६० भारतीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले अाहे.

अटलांटा २४ तास सज्ज
फ्लोरिडातील भारतीयांना सुरक्षितपणे हलवण्यासाठी अटलांटामध्ये व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटद्वारे दिली.

मदतीसाठी क्रमांक
अटलांटा - +14044052567 & +1678179393
किंगस्टन- +1876 833 4500; +1876 564 1378
बातम्या आणखी आहेत...