आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिन्याभरात अमेरिकेत दुसरे महाभयानक चक्रीवादळ, वीज पुन्हा झाली गायब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चक्रीवादळ मारियाने कॅरेबियन आयलंड प्यूर्टो रिकोत मोठा धुमाकूळ घातला आहे. - Divya Marathi
चक्रीवादळ मारियाने कॅरेबियन आयलंड प्यूर्टो रिकोत मोठा धुमाकूळ घातला आहे.
सॅन जुआन (प्यूर्टो रिको)-  चक्रीवादळ मारियाने कॅरेबियन आयलंड प्यूर्टो रिकोत मोठा धुमाकूळ घातला आहे. वादळामुळे शेकडो लोकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तसेच यात 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. चक्रीवादळामुळे संपूर्ण बेटावरील वीजपुरवठा ठप्प झाला आहे आणि याच्या  दुरूस्तीसाठी महिन्याभराचा वेळ लागणार आहे. कॅरेबियन बेटांवर आलेले हे महिन्याभरातील दुसरे वादळ आहे. तर मागील 90 वर्षातील अमेरिकेतील हे सर्वात मोठे चक्रीवादळ असल्याचे सांगितले जात आहे. 250 kmph च्या वेगाने वाहतोय वारा...
 
- प्यूर्टो रिको बेटावर साधारणपमे 35 लाख लोकसंख्या राहते. जी या वादळामुळे प्रभावित झाली आहे. 
- येथे 250 किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहत आहे. सोबतच मुसळधार पावसाने जनजीवन व्यस्त झाले आहे.
- इर्मजन्सी मॅनेजमेंट डायरेक्टर अबनेर गोमेज यांच्या माहितीनुसार, सर्वकाही संपले आहे. 20 इंच इतका पाऊस झाला आहे बहुतेक ठिकाणी महापूराची स्थिती आहे.
- प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी या बेटाला डिझास्टर झोन घोषित केला आहे जेणेकरून त्याला फेडरल मदत दिली जाऊ शकेल.
 
पूर्ण आयलंडवरील वीज गायब- 
 
- गर्व्हनर रिकाडरे रोसेलो यांनी बुधवारी रात्री सीएनएनला सांगितले की, पूर्ण वीज व्यवस्था ठप्प झाली आहे. 
- रोसेलो म्हणाले की, "प्यूटरे मागील काही काळापासून मंदीची झळ पोहचत आहे. येथील प्रशासनावर कर्जाचा डोंगर आहे. पॉवर ग्रिड सुद्धा जुने आहे आणि खूपच कमजोर झाली आहे. 
- वीज पुरवठा कधी सुरू होईल हे मी सांगू शकत नाही. चक्रीवादळाने आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
- गर्वनर पुढे म्हणाले, "आमच्याजवळ जास्त माहिती नाही. आमच्या देशाचा दक्षिण-पूर्व भागाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. "
 
या बेटांनाही अलर्ट-
 
- चक्रीवादळ मारियाने बुधवारी प्यूर्टो रिकोत एंट्री केली, जो अमेरिकी क्षेत्र आहे. हे वादळ कॅटेगरी-4 चे आहे. 
- अमेरिकेतील राष्ट्रीय तूफान केंद्र (एनएचसी) च्या माहितीनुसार, याचा वेग गुरुवारी रात्रीपर्यंत कमी येण्याची शक्यता आहे. हे वादळ शुक्रवारीपर्यंत उत्तर-पश्चिमोत्तरकडे वळेल. 
- प्यूर्टो रिकोशिवाय कुलेब्रा आणि विक्वेस, डॉमिनिक रिपब्लिकचा काबो एंगानोपासून प्यूर्टो प्लाटापर्यंत आणि तुर्क अॅंड कॅकोस आयलंडपर्यंत वादळ येईल असे अलर्ट दिले आहेत. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...