आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेंट्रल अमेरिकेच्या साल्वाडोर येथे 7.2 तीव्रतेचा भूकंप, महाराष्ट्रात सातार,रत्नागिरीत धक्के

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साल्वाडोर/मुंबई - सेंट्रल अमेरिकेतील निकारागुवा देशातील साल्वाडोर येथे गुरुवारी रात्री ७.२ तीव्रतेचे भुकंपाचे धक्के जाणवले. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू प्रशांत महासागरात साल्वाडोर येथून १४९ किलोमीटर दूर आणि जमिनीखाली ३३ किलोमीटर होता. भूकंपानंतर सुनामी अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात काही भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती आहे. सातारा परिसरात ४.३ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. याचा केंद्रबिंदू कोयना परिसरात जमिनीखाली १० किलोमीटर होता.
जीवितहानीचे वृत्त नाही...
- पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सेंटरने सांगितले, की भूकंपामुळे प्रशांत महासागरात ३ फूट उंच लाटा उसळल्या.
- याआधी गुरुवारी कॅरिबियाच्या सागरात आलेले ओट्टो वादळ हरीकेन निकारागुवा येथील साऊथ-इस्ट किनाऱ्यावर आदळले होते.
- या वादळाचा ताशी वेग १७५ किलोमीटर मोजला गेला होता.
- यामुळे किनारी भागातली नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते.
- दरम्यान, भूकंपाचे धक्के निकारागुआची राजधानी मानागुआ आमि कोस्टा रिकाची राजधानी सॅन जोस पर्यंत जाणवले. यात जीवितहानी वृत्त नाही.

महाराष्ट्रात कुठे जाणवला धक्के..
- सातारा जिल्ह्यात कोयना परिसरात 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले.
- भूकंपाचे केंद्र कोयना परिसरात जमिनीखाली 10 किलोमीटर होते.
- रत्नागिरी : देवरुखला 12.50 वाजता भूकंपाचा तीव्र स्वरुपाचा धक्का बसला.
- कोकणात चिपळूण येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
बातम्या आणखी आहेत...