आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला प्रथमच मेकअपशिवाय पाहिले अन् दिला घटस्फोट!, म्हणाला ओळखले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - संयुक्त अरब अमिराती नुकताच विवाह झालेल्या एका तरुणाने पत्नीला घटस्फोट दिला आहे. ‘पत्नी पोहण्यासाठी गेली असता तिचा मेकअप धुतला गेला. पहिल्यांदाच तिचा नैसर्गिक चेहरा समोर आल्याने मी तिला ओळखूच शकलो नाही,’ असा दावा त्याने केला आहे.

या ३४ वर्षीय तरुणाचा नुकताच २८ वर्षीय युवतीशी विवाह झाला होता. हे जोडपे शारजाह येथील अल मामझार समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले होते. पोहल्यामुळे पत्नीचा मेकअप धुतला गेला. त्यामुळे तिचा नैसर्गिक चेहरा पतीने प्रथमच पाहिला. पत्नी लग्नाच्या वेळी दिसत होती तेवढी सुंदर आता दिसत नाही. आपण तिला ओळखूच शकलो नाही. तिने कृत्रिम आयलॅशेस लावले होते तसेच लग्नाआधी कॉस्मेटिक सर्जरीही केली होती. मोठ्या प्रमाणात सौंदर्यप्रसाधने वापरून पत्नीने आपल्याला फसवले असा या तरुणाचा आरोप आहे, असे ‘गल्फ न्यूज’च्या वृत्तात म्हटले आहे.

डॉ. अब्दुल अजीज असफ यांनी या युवतीवर मानसोपचार केले. त्यांनी सांगितले की, घटस्फोटानंतर या युवतीला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला मदत करावी, अशी विनंती तिने केली होती. मला पतीला सर्व काही खरे सांगायचे होते, पण आता त्याला उशीर झाला आहे, असे या युवतीने सांगितले. त्यामुळे दोघांत आता तडजोडीची शक्यता उरलेली नाही. संयुक्त अरब अमिरातीत सध्या या घटनेवर सोशल मीडियात बरीच चर्चा सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...