शेंगडाँग - चीनमध्ये एका व्यक्तीने पत्नीचे नाक केवळ तिने यासाठी चावले की तिने त्याचा फोन उचलला नव्हता. या घटनेनंतर संबंधित महिलेचा पती फरार झाला आहे. पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहेत. हादरवून सोडणारी ही घटना पूर्व चीनच्या शेंगडँग येथील आहे.
चिनच्या पीपल्स डेली वेबसाईटनुसार, यांग असे अाडनाव असलेल्या या पीडित महिलेने सांगितले की, तिने रात्री दोन वाजता पतीचा कॉल रसिव्ह केला नव्हता. त्यामुळे नाराज असलेला तिचा पती शेंगडाँग येथील तिच्या ऑफिसमध्ये आला. त्याने तिला फार काही न बोलता थेट तिच्या नाकाचा चावा घेतला. यांगने सांगितले की, तिचा नवरा एवढा रागात होता की, त्याने तिच्या नाकाला चावा घेतल्यानंतर ते गिळूलेही. त्याने मला म्हटले तु माझा फोन का रिसिव्ह केला नाही आण त्यानंतर थेट नाकाचा चावा घेतला, एवढेच आठवत असल्याचे तिने सांगितले.
डॉक्टरांच्या मते यांगच्या पतीने तिचे नाक जवळपास पूर्णपणे खाऊन घेतले आहे. त्यामुळे तिला पूर्ण बरे करण्यासाठी एक मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. यांग आणि तिच्या पतीमध्ये घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा विवाह केला होता. पण त्यांच्यात काहीतरी कारणावरून वाद सुरू होते, अशी माहिती मिळाली आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS