आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुकूमशहाची अघोरी शिक्षा; बैठकीत डुलकी, मंत्री तोफेच्या तोंडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सियोल- उत्तर कोरियाचे संरक्षणमंत्री ह्यॉन योंग चोल यांना खुलेआम विमानभेदी तोफेने उडवण्यात आले. ते हुकूमशहा किम जोंग यांच्या बैठकीत डुलक्या घेत होते. नंतरही त्यांनी प्रश्नांची उलट उत्तरे दिली. हुकूमशहाने प्रश्न विचारल्यावर वा फटकारल्यानंतर निमूटपणे गुन्हा कबूल करण्याचा संकेत आहेत.

भर बैठकीत झोपा काढणे व उलटून उत्तर देणे हा देशद्रोह ठरवण्यात आला. ६६ वर्षीय संरक्षणमंत्री ह्यॉन यांना आधी अटक झाली. बंद खोलीत त्यांच्याबाबत उशिरानेच निर्णय झाला. तीन दिवसांनी ३० एप्रिलला नेमबाजी सराव मैदानावर शेकडो लोकांसमक्ष त्यांना विमानभेदी तोफेच्या तोंडी देण्यात आले.
यापूर्वीचे हुकूमशहा किम जोंग इल यांच्या अंत्ययात्रेत सहभागी असलेल्यांत ह्याॅन यांचा समावेश होता. आता त्या सातही जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी एकाला तर विवस्त्र करून भुकेल्या कुत्र्यांपुढे टाकण्यात आले होते. ह्यॉन यांना २०१० मध्ये जनरल व २०१२ मध्ये संरक्षणमंत्री करण्यात आले होते
.
असे तोफेने उडवले
ह्याॅन यांना झेडपीयू-४ या विमानभेदी तोफेने शेकडो लोकांच्या उपस्थितीत उडवण्यात आले. २६ हजार फुटांपर्यंत मारा करण्याची तोफेची क्षमता आहे. तोफ एकाच वेळी अनेक तोफगोळे डागते. ह्यॉन यांना ३०० फुटांवर उभे करून तोफेने त्यांच्यावर गोळे डागण्यात आले. यात ह्याॅन यांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या.
बातम्या आणखी आहेत...