आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी यातना स्वीकारते, तू शिक्षा मान्य कर - पीडितेनेे बलात्काऱ्याला जजपुढेच सुनावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रॉक टर्नर : २८ हजार लोकांनी याचिका दाखल करून जज एरॉन पर्स्कींकडे पुन्हा सुनावणीची मागणी केली. त्यांनी दोषीबाबत जास्तच नरमाई दाखवल्याचे लोकांचे म्हणणे आहे. - Divya Marathi
ब्रॉक टर्नर : २८ हजार लोकांनी याचिका दाखल करून जज एरॉन पर्स्कींकडे पुन्हा सुनावणीची मागणी केली. त्यांनी दोषीबाबत जास्तच नरमाई दाखवल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
सँटा क्लॅरा - अमेरिकेत बलात्कार पीडितेने न्यायाधीशांसमोर दाखवलेले धाडस प्रशंसनीय आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील माजी जलतरणपटू ब्रॉक अॅलन टर्नरला २३ वर्षीय महिलेवरील बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवले. गुरुवारी जजने त्याला फक्त ६ महिने कैद सुनावली. पीडितेने निकालावर नाराजी व्यक्त करत टर्नरला फैलावर घेतले. सोशल मीडियावरही युजर्सनी पीडितेची बाजू घेतली. २० वर्षांच्या कारकीर्दीत असे वक्तव्य आपण ऐकले नाही, असे खुद्द सँटा क्लॅरा काऊंटी डिस्ट्रिक्ट अॅटॉर्नीदेखील उद्गारले. पीडितेचे म्हणणे तिच्या शब्दांत...
* तुझं आयुष्य सुसह्य करण्यासाठी मीही मदत करेन : तू माझं सर्वस्व हिरावून घेतलंस. माझी प्रायव्हसी, ऊर्जा, वेळ, अंतरंग, आत्मविश्वास, माझा आवाजदेखील. जे व्हायचे ते झालं. त्याला कुणी बदलू शकत नाही. अाता आपल्याकडे एकच पर्याय आहे. ही नियती समजून आयुष्य बरबाद होऊ दे. मी अत्यंत दग्ध आणि दु:खी जगावं आणि तू आराेपांचा इन्कार करत राहा; नाहीतर आपण त्याचा सामना करू. मी यातना स्वीकारते, तू शिक्षा कबूल कर अन् आपण पुढच्या प्रवासाला निघूया. मला आशा आहे की, या धड्यानंतर तू चांगला माणूस बनशील. दुसऱ्यांचं आयुष्य बरबाद नाही करशील. तुझं आयुष्य आणखी चांगलं व्हावं म्हणून मीही मदत करेन.

पुढे वाचा... पहिला गुन्हा म्हणून टर्नरला कमी शिक्षा, माझ्यासोबतही हे प्रथमच तर घडलं
बातम्या आणखी आहेत...