आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • I Have More Sikhs In Cabinet Than Modi: Canada PM Justin Trudeau

माझ्या मंत्रिमंडळात मोदी कॅबिनेटपेक्षा जास्त; शीख कॅनडाच्या पंतप्रधानांचे वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुदो हजरजबाबीपणा आणि विनोदी स्वभावामुळे लोकप्रिय आहेत. या वेळी त्यांनी भारतातील केंद्र सरकारबाबत विधान केले आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले त्रुदो यांनी वायव्य वॉशिंग्टनच्या अमेरिकन विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून आलेल्या एका विद्यार्थ्याने या वेळी "तुमच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक शीख असणे खूपच चांगले आहे' असे म्हटले. त्याचे उत्तर देताना त्रुदो म्हणाले की, मोदींच्या मंत्रिमंडळात दोनच शीखधर्मीय मंत्री आहेत आणि माझ्या मंत्रिमंडळात सर्वाधिक ४ शीख मंत्री आहेत. त्रुदो हे मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान बनले आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात हरजित सिंग हे संरक्षण मंत्री असून अमरजित सोनी यांच्याकडे बांधकाम, बर्दीश छग्गर यांच्याकडे लघुउद्योग आणि नवदीप सिंग यांच्याकडे इनाेव्हेशन मंत्रालय आहे. सोनी यांनी कॅनडाच्या लष्करासाठी अफगाणिस्तानमध्ये सेवा दिली आहे. कॅनडात ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत १७ शीख खासदार निवडून आले आहेत. यापैकी १६ लिबरल पक्षाचे, तर एक कंझरव्हेटिव्ह पक्षाचा आहे. मोदी सरकारमध्ये मनेका गांधी आणि हरसिमरत कौर या दोन्ही शीखधर्मीय मंत्री आहेत. दरम्यान, सत्तेवर आल्यानंतर मोदी यांनी परदेश दौऱ्यावर भर दिला होता. त्यामुळे लोकप्रियतेत वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्रुदो यांनी हे वक्तव्य केले.