आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या ज्वालामुखीत सलग चौथ्यांदा भूकंप, लाव्हाचा मोठा स्फोट होण्याची भिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - आइसलंडचे सर्वात मोठे ज्वालामुखी असलेल्या बर्दरबुंगावर लवकरच लाव्हारसाचा मोठा स्फोट होणार अशी भिती व्यक्त केली जात आहे. जगभरातील संशोधकांनी हा अंदाज लावून स्थानिकांना सतर्क केले आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, आइसलंडच्या बर्फाच्छदित डोंगराळ भागात असलेल्या या ज्वालामुखीवर कित्येक वर्षांपासून मोठ-मोठ्या भूकंपांची साखळी सुरू आहे. बर्दरबुंगात स्फोट झाल्यास युरोपच्या मोठ्या हवाई क्षेत्रात राख आणि धूरचे वादळ तयार होतील. अशात पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. 
 
ब्लास्टची एवढी भिती का?
> आइसलंडमध्ये एकूणच 130 ज्वालामुखी आहेत. त्यापैकी बर्दरबुंगा सर्वात मोठा आणि घातक आहे. यापूर्वी 2014 मध्ये बर्दरबुंगात ज्वालामुखीचा स्फोट झाला होता. त्या स्फोटाला युरोपात आलेला 240 वर्षांतील सर्वात मोठा स्फोट संबोधण्यात आले होते. 
> तज्ञांच्या मते, 2010 मध्ये अएफ्लाजालाजोकुल ज्वालामुखी ब्लास्टपेक्षा तो 10 पटीने अधिक शक्तीशाली होता. त्या स्फोटाने अख्ख्या युरोपात वायू प्रदूष झाले होते. कित्येक दिवस हवाई मार्ग बंद किंवा रूट बदलावे लागले होते. 
> त्यावेळी एका मोठ्या हवाई क्षेत्रात धुळ आणि राखेचे वादळ पसरले होते. आइसलंडमध्ये कित्येक महिने पर्यटक आलेच नव्हते. 
> तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्यासाठी 2 वर्षे लागली होती. आता वारंवार होणाऱ्या भूकंपांमुळे तशाच प्रकारचा मोठा स्फोट होणार अशी भिती व्यक्त केली जात आहे. आता होणाऱ्या ब्लास्टची तीव्रता किती असेल हे कुणीही सांगू शकत नाही.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, ज्वालामुखीचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...