आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत आयसीयू ग्रँडपा... दुसऱ्यांच्या मुलांना खेळवता यावे यासाठी रोज रुग्णालयात येतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अटलांटा - आयसीयू ग्रँडपा नावाने आेळखले जाणारे डेव्हिड डचमन यांचे हे छायाचित्र. अमेरिकी शहर अटलांटाच्या चाइल्डकेअर हॉस्पिटलला भेट देणे हा त्यांचा नित्यक्रम. रुग्णालयात एकट्या अर्भकांसोबत ते वेळ घालवतात.अनेकांचे आई-वडील व्यग्रतेमुळे येता येत नाही. अशा अर्भकांना डेव्हिड मायेची ऊब देतात. सोशल मीडियावर डेव्हिड यांचे छायाचित्र शेअर झाल्यानंतर समोर आलेली ही रंजक कथा.
 
कोणतेही मूल क्षणभरही एकटे राहू नये असे मला वाटते : डेव्हिड
मी २००० मध्ये मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदावरून निवृत्त झालो. रिकामा वेळ घालवण्यासाठी एकदा चाइल्डकेअर हॉस्पिटलमध्ये आलो. मुलांसोबत वेळ घालवणे किती अद्््भुत  असते याची जाणीव झाली. मी एका मुलीस कुशीत घेतले होते तेव्हा रडायला लागली होती. मात्र, या कामाशिवाय अन्य कशात समाधान नाही हेही लक्षात आले. आठवड्याच्या सात दिवसांची पीडियेट्रिक आयसीयू व नियोनेटल आयसीयूमध्ये घालवता येतील,अशी विभागणी केली आहे. अवघ्या काही महिन्यांच्या अर्भकांची मी देखभाल केली आहे. आता ही मुले ५, १० व १५ वर्षांची झाली आहेत. त्यांना पाहून ज्या आठवणी येतात, त्या अमूल्य आहेत. कोणतेही मूल एक क्षणही एकटे राहू नये, असे वाटते. लोक विचारतात, तुम्ही काय करता? त्यावर मी मुलांचा सांभाळ करतो, असे अभिमानाने सांगतो.
- डेव्हिड डचमन
बातम्या आणखी आहेत...