आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Identical Twins Adopted Out Find Each Other Via Facebook

You Tube मुळे भेटल्या जुळ्या बहिणी, एक हॉलीवूडची अभिनेत्री तर दुसरी विद्यार्थिनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनाइस बॉर्डियर आणि समांथा फटरमॅन. - Divya Marathi
अनाइस बॉर्डियर आणि समांथा फटरमॅन.
लंडन - दोन जुळ्या बहिणी लहानपणीच विभक्त झाल्या. एक फ्रान्समध्ये तर दुसरी अमेरिकेत वाढू लागली. दोघींचेही जीवन एकमेकींपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. दरम्यान एक शिकण्यासाठी लंडनला जाते, तर दुसरी़ हॉलीवूडमध्ये अभिनेत्री बनते. एक दिवस लंडनमध्ये शिकणारी मुलगी आपल्या जुळ्या बहिणीला एका चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहते तर तिला धक्काच बसतो. ही एखाद्या चित्रपटाची कथा नाही, तर खऱ्या जीवनात विभक्त झालेल्या दोन जुळ्या बहिणी अनाइस बॉर्डियर आणि समांथा फटरमॅन यांची आपबिती आहे.

घडले असे की, लहानपणी या दोन्ही जुळ्या बहिणींना वेगवेगळ्या दाम्पत्यांनी दत्तक घेतले होते. लहान असल्याने दोघीही एकमेकींबाबत काही लक्षात ठेवू शकल्या नाहीत. विभक्त झाल्यानंतर या दोघींमधली एक अमेरिकेत आणि दुसरी फ्रान्समध्ये लहानाची मोठी होऊ लागली. दरम्यान, अमेरिकेत राहणारी समांथा हॉलीवूडमध्ये अभिनेत्री बनली, तर फ्रान्समध्ये वाढलेली अनाइस लंडनमध्ये शिक्षण घेऊ लागली.

अनाइसने तिच्या फेसबूक अकाऊंटवर '21 अँड ओव्हर' या हॉलीवूडपटाचा ट्रेलर शेअर केला होता. तिची नजर ट्रेलरमध्ये असलेल्या समांथावर गेली. ती अगदी आपल्यासारखीच दिसते हे तिला जाणवले. तिच्या मित्रांनी याआधीही तिला याबाबत सांगितले होते. पण तिचा विश्वास बसला नाही. पण ट्रेलर पाहिल्यानंतर अनाइसने फेसबूकवर समांथाला मॅसेज केला. त्यानंतर दोघी एकमेकींना भेटण्यासाठी पोहोचल्या.

या दोघींनी स्वतःबाबत माहिती गोळा करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, त्यांचा जन्म एकाच दिवशी दक्षिण कोरिया मध्ये झाला होता. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या कुटुंबांनी दत्तक घेतले. या दोघींनी भेटल्यानंतर डीएनए चाचणीही केली त्यावरून त्यांच्या लक्षात आले की, त्या दोघी जुळ्या बहिणी आहेत. अनाइसने सांगितले की, आमच्या दोघींचा जन्म 19 नोव्हेंबर 1987 ला सेऊल मध्ये झाला होता. सोशल मिडियामुळे विभक्त झालेल्या या बहिणींची पुन्हा भेट झाली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या दोघींचे आणखी काही PHOTOS