आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • IIFA Awards: Bollywood Fraternity Decend In Malesiya

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयफा पुरस्कार: बॉलीवूडचे तारकादल मलेशियात, आज झगमगाट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्वालालंपूर - बॉलीवूडचे सर्व दिग्गज अाज मलेशियाच्या भूमीवर अवतरणार असून वर्ष २०१५ च्या इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकॅडमी अवॉर्ड (आयफा)मध्ये आपली कला सादर करतील. मलेशियात आयफा आयोजनाची ही दुसरी वेळ आहे. मलेशियातील बॉलीवूड फॅन्सचा उत्साहही आयफाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षक अनुभवतील.

आयफा सोहळ्याचे आयोजन दरवर्षी परदेशात होते. फिक्की-आयफा यांच्या संयुक्त विद्यमाने या वेळी ग्लोबल बिझनेस फोरमचेही आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही देशांत पर्यटन व व्यापारवाढीसाठी या मंचावरून पुढाकार घेण्यात आला आहे.

१३ वर्षांपूर्वी झाला होता समारंभ
१३ वर्षांपूर्वी आयफा पुरस्काराचे आयोजन क्वालालंपूर येथे करण्यात आले होते. येथील लोकांचे बॉलीवूडशी नाते दृढ होत आहे. हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीदेखील येथे अनुकूल वातावरण असल्याचे आयफाचे प्रवक्ते आंद्रे टिमिन्स म्हणाले. बॉलीवूड तारकांची उपस्थिती उभय राष्ट्रांतील व्यापार व पर्यटनवाढीला चालना देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
>प्रमुख आकर्षणे: ‘टू स्टेटस’, ‘हैदर’ या चित्रपटांना सर्वाधिक ९ विविध श्रेणीतील नामांकने मिळाली आहेत. ‘क्वीन’, ‘तनू वेड्स मनू रिटर्न’ या चित्रपटांतील भूमिकेसाठी कंगना राणावत, तर ‘मेरी कोम’साठी प्रियंका चोप्रा यांची नामांकने आहेत.

तरुणाईकडे सूत्र
सोनाक्षी सिन्हा, श्रद्धा कपूर, परिणीती चोप्रा यांच्यासह अनेक नवे कलाकार धमाकेदार सादरीकरण करतील. सूत्रसंचालनाची धुरा रणवीर सिंग व अर्जुन कपूर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आयफाच्या नामांकनातही तरुण दिग्दर्शक-कलाकारांचे प्रमाण जास्त आहे. ‘दिल धडकने दो’ या आगामी चित्रपटाचा पहिला शोदेखील पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख आकर्षण आहे. सोहळ्याच्या समारोपाला हृतिक रोशनचे खास नृत्य आहे.

>ज्येष्ठ निर्माता: दिग्दर्शन सुभाष घई यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.