आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाइव्ह टीव्ही शोमध्ये वकीलाने इमामांना जोड्याने मारले, हिजाबवर सुरु होती चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इजिप्तचे वकील नबीह अल-वाहश यांना इमाम राशिद यांनी मांडलेला तर्क पटला नाही. - Divya Marathi
इजिप्तचे वकील नबीह अल-वाहश यांना इमाम राशिद यांनी मांडलेला तर्क पटला नाही.
काहिरा - एका लाइव्ह टीव्ही शोमध्ये एक वकील आणि ऑस्ट्रेलियाचे इमाम मुद्द्यावरुन गुद्द्यांवर आले. दोघांमध्ये स्टुडिओमध्येच हाणामारी सुरु झाली. शरीयत कायद्यावर चर्चा सुरु होती. यावेळी वकीलाचा तोल ढळला आणि त्यांनी मुफ्तींना जोडा फेकून मारला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
काय आहे प्रकरण
- शोमध्ये महिलांनी हिजाब परिधान करावा किंवा नाही यावर चर्चा सुरु होती.
- सिडनीचे इमाम मुस्तफा राशिद यांनी परिधान करणे धर्माचे पालन म्हणण्याऐवजी परंपरा असल्याचे सांगितले.
- इजिप्तचे वकील नबीह अल-वाहश यांना इमाम राशिद यांनी मांडलेला तर्क पटला नाही.
- लवकरच दोघांमध्ये या मुद्द्यावरुन वाद पेटला.
- यावेळी वकील नबीह यांनी त्यांच्या पायातील बूट काढून इमाम राशिद यांना मारण्यास सुरुवात केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...