आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मजबुतीच्या दिशेने जात आहे भारताची अर्थव्यवस्था; नोटबंदी, GST चा निर्णय ऐतिहासिक - IMF

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंगटन - इंटरनॅशनल मॉनेटरी फंड (IMF) प्रमुख क्रिस्टीन लेगार्ड यांनी भारताची अर्थव्यवस्था मजबुतीच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचे सांगितले आहे. एवढेच नव्हे, तर मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय सुद्धा आर्थिक सुधारणांसाठी ऐतिहासिक पाऊल होते. या निर्णयांमुळे थोडीफार आर्थिक मंदी आली तरीही मला आश्चर्य वाटणार नाही असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, अर्थमंत्री अरुण जेटली वर्ल्ड बँक आणि आयएमएफसोबत होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत पोहोचले आहेत. 
 
विकासदर कमी होण्याची शक्यता
- काही दिवसांपूर्वीच IMF ने 2018 साठी भारताच्या जीडीपीची गती 6.7 राहणार असा अंदाज लावला होता. 2016 च्या तुलनेत हा दर 0.3 टक्क्यांनी कमी आहे. 
- IMF ने जीडीपीचा दर कमी राहण्यासाठी नोटबंदी आणि जीएसटीवर खापर फोडले होते. 
- मात्र, आता IMF च्या प्रमुख म्हणाल्या, "भारताबद्दल बोलावयाचे झाल्यास विकासदर थोडा कमी होईल. मात्र, मध्यम दीर्घकालीन परिणामांची अपेक्षा करताना भारत मजबुतीच्या दिशेने जात आहे. गतवर्षी झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे असे होत आहे."
- यासोबतच नुकसान कमी झाल्याने महागाई सुद्धा कमी होईल. पायाभूत सुधारणा रोजगार उपलब्ध करून देतील असे मत लेगार्ड यांनी व्यक्त केले. 
 
गुजरातचे निकालच सांगतील खरे काय- जेटली
- अर्थमंत्री अरुण जेटली यांना आर्थिक सुधारणा आणि जीएसटी तसेच नोटबंदीवर विचारले असता त्यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीचा विषय बाहेर काढला. नोटबंदी आणि जीएसटीमुळे सारे जग भारताच्या धाडसाचे कौतुक करत आहे. 
- गुजरात विधानसभा निवडणुकीतच हे स्पष्ट होईल की लोक नोटबंदीला आणि जीएसटीला सपोर्ट करत आहेत की नाहीत. या आर्थिक सुधारणांमुळे साऱ्या जगात भारताची इमेज एक सर्वात जबाबदार देश म्हणून बनली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...