आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पार्क गुन यांच्याविरोधात आणणार महाभियोग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेऊल - भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेल्या दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षा पार्क गुन हे यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. राष्ट्राध्यक्षा पार्क याही भ्रष्टाचारात सहभागी होत्या, पण त्यांच्याविरोधात सध्या खटला चालवला जाऊ शकत नाही, असे रविवारीच सेऊलच्या मुख्य सरकारी वकील कार्यालयाने म्हटले होते.

लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी या प्रमुख विरोधी पक्षाचे नेते चू मी आए म्हणाले की, आम्ही महाभियोग प्रस्ताव आणण्याची वेळ आणि पद्धत यावर विचार करत आहोत तसेच महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यासाठीच्या पद्धतीवर विचार करण्यासाठी उपसमिती स्थापन करणार आहोत. आपण राष्ट्राध्यक्षांना पदावरून हटवू इच्छितो, असे दोन लहान विरोधी पक्षांनी याआधीच जाहीर केले होते. तिन्ही विरोधी पक्षांची एकत्रित मते ५५ टक्के एवढी होतात. महाभियोग प्रस्ताव मंजूर होण्यासाठी दोन तृतीयांश मतांची गरज आहे.

महाभियोग प्रक्रियेला प्रदीर्घ कालावधी लागू शकतो. त्यामुळे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी फार घाई करण्याच्या तयारीत नाही. कॉन्झर्व्हेटिव्ह मते दूर जातील की काय, अशी भीती या पक्षाला वाटत आहे. पार्क गुन हे यांचा पाच वर्षांचा पहिला कार्यकाळ फेब्रुवारी २०१८ मध्ये संपेल. कुठल्याही खटल्यापासून बचाव करण्यासाठी कार्यकाळ पूर्ण करण्यास त्यांचे प्राधान्य राहील, असे चित्र आहे. त्यामुळे आता महाभियोग येतो की नाही याकडे राजकीय तज्ज्ञांचे लक्ष लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...