आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेमिमापासून ते रेहमपर्यंत PLAYBOY इम्रान खानचे अनेकांशी होते संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - पहिली पत्नी जैमिमा आणि दुसरी पत्नी रेहम(डाव्या बाजूला) - Divya Marathi
फोटो - पहिली पत्नी जैमिमा आणि दुसरी पत्नी रेहम(डाव्या बाजूला)
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि तहरिक-ए-इन्साफ पक्षाचा नेते इम्रान खान यांनी 62 व्या वर्षी निकाह केल्यानंतर दहा महिन्यांच्या आत पुन्हा घटस्फोटासठी अर्ज केला आहे. नुकतीच इम्रान आणि रेहम विभक्त झाल्याची बातमी समोर आली आहे. दोघांनीही त्याला दुजोरा दिला आहे. इम्रान खान यांचे हे दुसरे लग्न होते. पण त्यांचे अनेक महिलांबरोबर अफेअर असल्याच्या चर्चा होत्या.

इम्रान यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्यांची प्रतिमा एका प्लेबॉयची होती. कसलेली शरीरयष्टी, भोळाभाबडा चेहरा आणि नवाबी थाट त्याच्या या स्टाइलवर मुली फिदा होत.

वडील होते सिव्हिल इंजिनिअर
इम्रान खान नियाजींचा जन्म 25 नोव्हेंबर 1952 रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे वडील इकरमुल्लाह खान नियाजी हे सिव्हिल इंजिनिअर होते. लहानपणी इम्रान लाजाळू होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण इंग्लंडच्या रॉयल ग्रामर स्कूल वॉरसेस्टर येथे झाले. येथेच क्रिकेटचे प्राथमिक धडे घेतले आणि याच खेळात त्यांनी नावलौकिक मिळविले. 1972 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रातून पदवी घेतली. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात स्वतःची प्रतिमा निर्माण केली आहे.

बेनझीर भुत्तोंबरोबर जोडले गेले नाव
प्लेबॉय इमेज असेलेले इम्रान खान जेव्हा ऑक्सफोर्डमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यासोबत त्याचे नाव जोडले गेले. या दोघांचे अफेअर असल्याचे बोलले जात होते. 1975 मध्ये दोघेही ऑक्सफोर्डमध्ये होते. तेव्हा बेनझीर यांचे वय 21 होते. या दोघांची खास मैत्री होती, मात्र हे नाते लग्नात बदलू शकले नाही. या सर्व घटनांचा खुलासा 2009 मध्ये झाला हे विशेष. पाकिस्तानी जनतेसाठी हा खुलासा खळबळजनक होता. या दोघांच्या संबंधाची माहिती समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात जणू भूकंप आला होता. पाकिस्तानी जनतेने हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले होते.

अनेक महिलांशी संबंध
इम्रान खानने 3 जून 1971 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या बर्निंगहम कसोटीतून क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानतंर तीन वर्षांनी (1974) वनडे क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. त्यांची कामगिरी पाहून 1982 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचे कर्णधार नियुक्त करण्यात आले. या काळात त्यांच्या आयुष्यात अनेक महिला आल्या. त्यांच्या व्यक्तीमत्वावर अनेक तरुणी जीव ओवाळून टाकत. त्यांच्या गर्लफ्रेंडच्या लिस्टमध्ये क्रिस्टिएन बॅकर, सुसान्नाह कॉन्स्टेनटाइन, अॅमा सर्जेंट आणि सीता व्हाइट यासारख्या सौंदर्यवतींची नावे आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, इम्रान खान आणि त्यांच्या गर्लफ्रेंडचे PHOTOS