आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US गे क्लबमध्‍ये फायरिंगदरम्‍यान गेट उघडून या भारतीय युवकाने 70 जणांना वाचवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- फ्लोरिडाच्‍या 'पल्स' एलजीबीटी नाइट क्लबमध्‍ये 12 तारखेला झालेल्‍या फायरिंगमध्‍ये 53 जण ठार झाले होते. मूळ भारतीय असलेले माजी यूएस मरीन इम्रान यूसुफ यांनी क्लबचेमागचे गेट उघडले नसते तर, मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला असता. इम्रान यांना यूएसमध्‍ये सध्‍या हिरो मानले जात आहे. त्‍यांनी सुमारे 70 लोकांचे प्राण वाचवले. इम्रान क्लबमध्‍ये बाउंसर होते. क्रॉस फायरिंगमध्‍ये हल्‍लेखोर उमर मतीन पोलिसांच्‍या हातून ठार झाला. मात्र, त्‍यापूर्वी त्‍याने 53 लोकांचा बळी घेतला. त्‍या रात्री काय झाले इम्रान सांगतो..
- गे नाइट क्लबमध्‍ये रविवारी रात्री जेव्‍हा उमर मतीनने फायरिंग सुरू केली तेव्‍हा इम्रान ड्युटीवर होते.
- 24 वर्षीय इम्रान यांच्‍या माहितीनुसार, "जेव्‍हा फायरिंग सुरू झाली होती, तेव्‍हा मी क्लबमधील मागच्‍या भागात होतो."
- "मी सुरूवातीला तीन ते चार गोळ्या चालल्‍याचा आवाज ऐकला. येथे फायरिंग सुरू असल्‍याचे स्‍पष्‍ट लक्षात येत होते."
- "सर्वजण आपापल्‍या जागेवर थांबले होते. मी विचार केला की, मागचा दरवाजा उघडला तर, लोकांना वाचवले जाऊ शकते."
- "मी लोकांना ओरडून सांगत होते की, "ओपन द डोर" "ओपन द डोर".
- मात्र लोक एवढे घाबरले होते की, काय करावे त्‍यांना सूचत नव्‍हते. कोणीच समोर यायला तयार नव्‍हते.
- "आमच्‍याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्‍हता. आम्‍ही तेथे थांबलो असतो तर, ठार झालो असतो. मी प्रयत्‍न करून मागचा दरवाजा उघडला."
- "त्‍यानंतर भराभर लोक बाहेर पडले आणि त्‍यांचे प्राण वाचू शकले."
- मीडिया रिपोर्टनुसार, यूसुफनी 60 ते 70 लोकांचे प्राण वाचवले.
- इम्रानचे भाऊ अमीर युसूफ म्‍हणाले, "आम्‍हाला अशी आशा नव्‍हती की, माझ्या भावाची मरीन कॉर्प्‍समधील ट्रेनिंग कधी एवढ्या कामात येईल."
- "त्‍याने 17 व्‍या वर्षी हायस्‍कूलनंतर मरीन ज्‍वॉइन केले होते. त्‍याने अफगाणिस्‍तान आणि इराकमध्‍येही सर्व्‍हिस दिली आहे. तो एका महिन्‍यापासून तेथे काम करत होता."
पुढे पाहा, संबंधित फोटो..