आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाटा समूहाच्या दोन कंपन्यांना अमेरिकेत 6 हजार कोटींचा दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - टाटा समूहाच्या दोन कंपन्यांवर अमेरिकेतील न्यायालयाने सुमारे 6 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. व्यापार गोपनीयतेच्या एका प्रकरणात हा दंड ठोठावण्यात आला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस टाटा अमेरिका इंटरनॅशनल कार्पोरेशन अशी या कंपन्यांची नावे आहेत.

इपिक सिस्टीमचे सॉफ्टवेअर विनापरवाना वापरल्याचा या कंपन्यांवर आरोप असून यापोटी कंपनीला सुमारे १५०० कोटी रुपये देण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त उर्वरित सुमारे साडेचारशे कोटी रुपये दंड म्हणून द्यावे लागणार आहेत.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ही भारतातील सर्वांत मोठी सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी कंपनी असून इपिक कंपनीने ऑक्टोबर २०१४ मध्ये टाटा समूहातील या कंपन्यांविरुद्ध खटला दाखल केला होता. यात गोपनीय माहिती, दस्तऐवज इतर महत्त्वाचा डेटा चोरल्याचा आरोपही यात करण्यात आला होता. दरम्यान, या निकालाविरुद्ध विस्कोसिन प्रांतातील उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे टीसीएसच्या सूत्रांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...