आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लेखोरास क्षमा करा, मृतांच्या नातेवाइकांचा दयाभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार्ल्सटन- चार्ल्सटनमध्ये ऐतिहासिक चर्चवर हल्ला करणाऱ्या तरुणास निर्घृण कृत्याबद्दल कठोर शिक्षा नव्हे, तर क्षमा करावी, अशी दयाभावना मृतांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. शुक्रवारी झालेल्या प्रार्थनेनंतर नातेवाइकांनी ही मागणी केली.

आरोपी डायलन रूफ (२१) काळ्या-पांढऱ्या रंगातील कपडे परिधान करून कोर्टात शांतपणे उभा होता. न्यायालयात शनिवारी पीडितांच्या नातेवाइकांनी आपले जबाब नोंदवले. त्या वेळीदेखील रूफच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. प्रश्न विचारल्यानंतरही त्याने केवळ येस सर, नो सर, अशी उत्तरे दिली. जबाब नोंदवणाऱ्यांत फेलिशिया सँडर्सदेखील होते. हल्ल्याच्या घटनेत त्यांनी २१ वर्षांचा मुलगा तायवांजा गमवला. त्याचबरोबर पाच वर्षांची नातही गमवावी लागली. कुटुंब आणि नातेवाइकांचे अश्रू थांबत नव्हते.

डबडबत्या डोळ्यांनी नातेवाईक जबाब देत असतानाच आरोपीला माफी देण्यात यावी, अशी मागणी कोर्टाकडे करत होते. त्या अगोदर ‘मदर इमॅन्युएल’ चर्चमध्ये मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी प्रार्थना झाली. चार्ल्सटनचे नागरिक सहभागी झाले होते.

मृत्युदंडाची शिक्षा व्हावी : हेली
दक्षिण कॅरोलिनाच्या भारतीय वंशाच्या गव्हर्नर निकी हेली सरकारी वकिलाशी बोलताना म्हणाल्या, हल्लेखोराला कमीत कमी शिक्षा व्हावी, अशी मागणी कोर्टाकडे करू नका. दुसरीकडे रूफ यांच्या वकिलांनी एक वक्तव्य जारी करून पीडितांच्या कुटुंबीयांविषयी संवेदना आणि दु:ख व्यक्त केले आहे. त्यातून निर्लज्जपणा दिसून आला.

न्यायमूर्तींवर वंशभेदाची झाली होती टीका
मुख्य न्यायमूर्ती जेम्स गॉस्नेल यांनी हल्लेखोर डॉयलन रूफ (२१) यास विना बाँडची अटक करावी, असे आदेश दिले. परंतु सुनावणीदरम्यान रूफ याचे कुटुंबीयदेखील पीडित असल्याचे म्हटले. गॉस्नेल यांना २००५ मध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात दोन प्रकरणात वंशभेदावरून टीकेला सामोरे जावे लागले होते. त्या वेळी प्रकरण कृष्णवर्णीय आरोपीच्या बाँडचे होते.

स्त्रियांवर अत्याचार केले
हल्ल्यातील मृत तायवांजाचे मित्र कोर्टात म्हणाले, मला सोडून दे, अशी विनंती तायवांजाने हल्लेखोरास केली होती. त्यावर हल्लेखोर म्हणाला, तुला कसे सोडून देऊ? तू आमच्या महिलांवर अत्याचार केले. मला जे वाटेल तेच मी करणार.
जगात असा देश नाही : आेबामाही हतबल
अमेरिकेतून अद्यापही वंशभेदाचा अभिशाप पुसला गेलेला नाही हेच चार्ल्सटनची घटना दर्शवते. ते मेयरच्या संमेलनात बोलत होते. त्यांनी बंदुकीसंबंधीच्या कायद्यावर राजकारण केले जात असल्याचा आरोप करणाऱ्यांनाही त्यांनी फटकारले. ते म्हणाले, पृथ्वीवरील कोणत्याही विकसित देशांत एवढ्या वेगाने हत्या होत नाहीत.
बातम्या आणखी आहेत...