आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत भारत-पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री येणार समोरासमोर; द्विपक्षीय चर्चा अनिश्चित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ हे न्यूयॉर्कमध्ये पुढील आठवड्यात आमनेसामने येतील. अर्थात दोन्ही नेत्यांच्या द्विपक्षीय बैठकीबाबत अनिश्चितताच आहे. दोन्ही नेते संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) महासभेच्या ७२ व्या अधिवेशनात सहभागी होतील. हे अधिवेशन मंगळवारपासून सुरू होत आहे. त्याचबरोबर 
दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री शांघाय सहकाय संघटना (एससीओ) आणि दक्षिण क्षेत्रीय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेतही सहभागी होतील. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीशकुमार यांनी सांगितले की, जर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री विभागीय बैठकांत सहभागी झाले तर दोघांत चर्चा शक्य आहे, पण मला द्विपक्षीय चर्चेची माहिती नाही. परराष्ट्रमंत्र्यांचा ८ दिवसांचा कार्यक्रम आहे. त्या सोमवारी न्यूयॉर्कमध्ये असतील आणि २३ सप्टेंबरला यूएन अधिवेशनात भाषण देतील. आम्ही अनेक द्विपक्षीय, त्रिपक्षीय, विभागीय बैठकांची व्यवस्था केली आहे.
 
काश्मीर मुद्दा उपस्थित करणे म्हणजे ‘मियाँची दौड मशिदीपर्यंत’ सारखे  
यूएनमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन म्हणाले की, यूएनमध्ये पाकिस्तानच्या वतीने काश्मीर मुद्दा उपस्थित करणे ‘मियाँची दौड मशिदीपर्यंत’ असे आहे. माध्यमांच्या प्रश्नांवर अकबरुद्दीन म्हणाले की, भारत विकासाचा दृष्टिकोन ठेवून वाटचाल करत आहे. आमचे दूरदर्शी उद्दिष्ट आहे. दुसरीकडे इतर देश भूतकाळातील मुद्द्यांवर अडून आहेत. ते भूतकाळातच जगतात. यूएनमध्ये अनेक दशके ज्यावर चर्चा झाली नाही अशा मुद्द्याकडे पाकिस्तानचे लक्ष आहे. त्याला त्याकडेच लक्ष द्यायचे असेल तर ठीक आहे. 
 
जैशचा म्होरक्या अझहरबाबत निर्णयाची वेळ जवळ  
सय्यद अकबरुद्दीन म्हणाले की, जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरवर निर्णयाची वेळ जवळ आली आहे, भलेही संयुक्त राष्ट्रांनी त्याच्याविरोधात कारवाई करण्यास परवानगी दिली नाही तरी. ते म्हणाले की, आम्ही अझहरचा पाठलाग करतच राहू. गेल्या महिन्यातच चीनने ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेच्या अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्यास, बंदी घालण्यास आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर व्हेटो वापरला होता. 
 
सिंधू पाणी वाटप करारावर लवाद गठित करण्याची पाकची मागणी
पाकिस्तानने सिंधू पाणी वाटप करारावर भारताशी असलेला वाद सोडवण्यासाठी लवाद स्थापन करण्याची मागणी जागतिक बँकेकडे केली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींदरम्यान रातले आणि किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची चर्चा १४-१५ सप्टेंबरला जागतिक बँकेच्या मुख्यालयात झाली होती. दोन्ही योजनांना पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. दोन्ही देशांत झालेल्या सचिव स्तरावरील चर्चा कुठल्याही सहमतीशिवाय संपली होती. 
बातम्या आणखी आहेत...