आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणमध्ये एकाच दिवशी २० सुन्नी पंथीयांना फाशी, सशस्त्र हल्ल्याच्या घटनांच्या दोषी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहरान - इराणने २० ‘दहशतवाद्यांना’ मंगळवारी फाशी देऊन ठार केले. सुन्नी पंथीय कट्टरवादी असलेले कैदी अनेक हत्या व राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर दोषी आढळून आल्याने त्यांना ही शिक्षा देण्यात आल्याचे इराणने गुरुवारी जाहीर केले. फाशी देण्यात आलेल्या आरोपींनी महिला, मुलांच्या निर्घृणपणे हत्या केल्या. कुर्दीश प्रांतात तर त्यांनी सुन्नीच्या धार्मिक नेत्यांचीही हत्या केली होती. विविध गुन्ह्याबाबतचा तपशील बुधवारी जाहीर करण्यात आला होता. २००९ ते २०११ दरम्यान संघटनेने महिला-मुलांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तो सिद्ध झाल्यामुळे ही कारवाई केल्याचे इराण सरकारचे म्हणणे आहे. आतापर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात २४ सशस्त्र हल्ले झाले होते. इराणमध्ये तावाहिद व जिहाद नावाची संघटना कार्यरत आहे. पश्चिमेकडील प्रांतात झालेल्या तीन हल्ल्यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. अशा अनेक हल्ल्यांत संघटनेचा हात आहे. संघटनेत १०२ सशस्त्र सदस्य तसेच समर्थक आहेत. संघटनेची अनेकवेळा पोलिस, सुरक्षा दलाशी चकमक झाली होती. २००९ मध्ये संघटनेने सुन्नी नेते मामुस्ता बोरहान अली व शेख अल- इस्लाम यांची हत्या केली होती. दरम्यान, तावहिद ग्रुपचे सदस्य असलेल्या दोषींना ही शिक्षा झाल्याची माहिती सरकारी वकील मोहंमद जावेद माँटाझेरी यांनी इराणी टीव्हीवरून गुरुवारी दिली.

गेल्या वर्षी ९७७ ठार
शियाबहुल इराणमध्ये गेल्या वर्षी ९७७ जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली होती, असा दावा मानवी हक्क संघटनेने केला आहे. मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करणारा इराण हा दुसरा देश आहे. चीनमध्ये गेल्या वर्षी १ हजार जणांना मृत्युदंड देण्यात आला होता. इराण नंतर पाकिस्तानचा (३२६) क्रमांक लागतो. त्यानंतर सौदी (१५८) आहे.
बातम्या आणखी आहेत...