आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • In Nigeria Attacked On Mosque, 44 Killed, 67 Injured

नायजेरियातील मशिदीवर हल्ला; ४४ ठार, ६७ जण जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्र: बोको हराम या दहशतवादी संघटनेने नायजेरियाच्या जामबरमरीमध्‍ये घरे जाळली)
जॉस - नायजेरियातील एका मशिदीवर झालेल्या बाँबहल्ल्यात किमान ४४ जण ठार तर ६७ जण जखमी झाल्याची घटना सोमवारी मध्य नायजेरियातील शहरात घडली. पवित्र रमजानच्या निमित्ताने मशिदीत शेकडो लोक जमलेले होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांना लक्ष्य केले.
यांताया मशिदीत दोन स्फोट झाले. मुख्य धर्मगुरूंचे मशिदीत मार्गदर्शन सुरू होते. त्याचवेळी गर्दीत मोठा स्फोट झाला. दुसरा स्फोट शागालिंकू येथील रेस्तराँमध्ये झाला. नायजेरियातील उत्तरेकडील शहरात मुस्लिमांची संख्या मोठी आहे. यापूर्वी शहराला बोको हरमने लक्ष्य केले होते. करण्यात आले होते. त्यात शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता.