Home »International »Other Country» In Northern Siberia Men Are Using Illegal New Methods To Root Out

जीव मुठीत धरून चालवावा लागतो ट्रक, जेव्हा या खतरनाक रस्त्याने जावे लागते!

दिव्यमराठी वेब टीम | Sep 13, 2017, 10:31 AM IST

  • सायबेरियातील नदीत फसलेला अन्नधान्य नेणारा ट्रक...
इंटरनॅशनल डेस्क- रशियातील पूर्व भागातील सायबेरियात हिवाळ्यात दरवर्षी नदी गोठल्या जातात. या दरम्यान सायबेरियातील लोकांचे रशियाच्या अन्य भागातील संपर्क तुटतो. कारण कडक थंडीमुळे रेल्वेमार्गापासून ते रस्ते सर्वावर बर्फच बर्फ जमा होते. मात्र, तेथेही असे काही लोक आहे जे त्याची वाट पाहत बसतात. ते लोक असतात ड्रायव्हर, ज्यांना या काळात पैसे कमविण्याची मोठी संधी असते. हे ड्रायव्हर ट्रकमधून सायबेरियातील वेगवेगळ्या भागात खाण्या-पिण्याची साहित्य पोहचवतात. मात्र, हे काम त्यांना जीवावर हात ठेवून करावे लागते. अनेकदा ते दुर्घटनेचे बळी ठरतात. एका ड्रायव्हरसोबत फोटोग्राफरने केला खतरनाक प्रवास.....
- ही घटना मार्च 2016 मधील आहे, जेव्हा ब्रिटनचे प्रसिद्ध फोटोग्राफर अमोस चॅपल यांना या ड्रायव्हर्सबाबत माहिती मिळाली तेव्हा ते सरळ सायबेरियात पोहचले.
- तेथे त्यांनी फोटोग्राफीसाठी रुसला नावाच्या एका ट्रक ड्रायव्हरला पटवले व त्याच्यासोबत खतरनाक प्रवासाला गेले.
- अमोस सांगतात की, ते खूपच धोकादायक काम आहे, कारण ड्रायव्हर कित्येक टन वजनी साहित्य भरून ट्रकला बर्फाने जमलेल्या रस्त्यावरून ड्राईव्ह करायचे होते. म्हणजेच पातळ बर्फाच्या लादीवरून ट्रक कधीही घसरून फसू शकतो, अडकू शकतो.
- ड्रायव्हरला नदीतूनही ट्रक घालावे लागतात. कारण रस्त्यावर बर्फाच्या उंचच उंच लाद्या तयार होतात त्यामुळे तेथून ड्रायविंग केले जाऊ शकत नाही.
- याशिवाय ट्रक ड्रायव्हरला वाकड्या-तिकड्या अनेक धोकादायक पर्वतरांगा पार कराव्या लागतात. जे खूपच धोकादायक असते.
- नुकतेच अमोसने आपल्या या प्रवासादरम्यानचे काही फोटोजचे प्रदर्शन भरवले आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फोटोग्राफर अमोस द्वारा प्रवासादरम्यान टिपलेले फोटोज...

Next Article

Recommended