आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISISने बनवली जगातील सर्वात मोठी दफनभूमी, रोज पुरतात 200 मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे एखादे शहर नव्हे तर आहे जगातील सर्वात मोठी दफनभूमी... - Divya Marathi
हे एखादे शहर नव्हे तर आहे जगातील सर्वात मोठी दफनभूमी...
इंटरनॅशनल डेस्क- काय तुम्ही कधी ऐकले आहे का, एखाद्या दफनविधी पाहण्यासाठी पर्यटक येतील? आता तुम्ही म्हणाल, काय कोणी व्यक्ती दफनभूमी थोडीच जाणार आहे. मात्र, जगातील सर्वात मोठी दफनभूमी असलेल्या 'वादी-अल-सलम' ही दफनभूमी पाहायला दरवर्षी लाखो लोक तेथे पोहचतात. इराकमधील नजफ शहरात आहे ही दफनभूमी....
- इराकमधील नजफ शहरातील या दफनभूमीला पीस व्हॅली नावाने ओळखले जाते.
- दहशतवाद्यांचा खासकरून ISIS चा गड मानल्या गेलेल्या या देशात एवढे हल्ले होतात की, येथे दररोज सुमारे 200 मृतदेहाचा दफनविधी केला जातो.
- हे सर्व मृतदेह याच याच दफनभूमीत पुरले जातात. जेव्हा येथे दहशतवादी कारवाया होत नव्हत्या तेव्हाही येथे 80 ते 100 डेड बॉडीज पुरल्या जायच्या.
- मात्र, आता दहशतवादी हल्ल्यामुळे हा आकडा वाढून तो 200 वर गेला आहे. मात्र, मागील काही दिवसात हा आकडा पुन्हा खाली आला आहे.
50 लाखांहून अधिक मृतदेह पुरलेत या दफनभूमीत-
- नजफ शहरातील या पीस व्हॅलीत आतापर्यंत किमान 50 लाखांहून अधिक डेड बॉडीज दफन केल्या आहेत.
- ही दफनभूमी 1 हजार 485 एकर जमिनीवर पसरली आहे.
- जवळपास 1400 वर्षांपासून येथे बॉडीज दफन केल्या जातात.
काय येतात लाखो पर्यटक?
- या दफनभूमीत शिया धर्माचे पहिले इमाम अली इब्न अबी तालिब यांची डेड बॉडीज येथे दफन केली होती.
- त्याच्या प्रार्थनास्थळावर त्याचे लाखो अनुयायी येथे माथा टेकवतात.
- एवढेच नव्हे तर याच दफनभूमीत आपल्याला दफन करावे अशी प्रत्येक शिया समुदायातील लोकांची इच्छा असते.
युद्धात जाण्यापूर्वी सैनिक येथे मागतात मन्नत-
- येथे प्रार्थनास्थळावर येऊन ISIS शी लढायला जाणारे सैनिक मन्नत मागतात की, जर मला मृत्यू आला तर याच दफनभूमीत मला जागा मिळावी.
- येथे बनवलेल्या समाधी (कब्र) विटा, प्लॅस्टर आणि कॅलिग्राफीने सजवल्या जातात.
- ज्याची जितकी ऐपत त्यानुसार ती जागा सजवली जाते.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जगातील सर्वात मोठी दफनभूमीचे आणखी काही फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...