छायाचित्रात तुम्हाला बांगलादेशात होत असलेल्या विशाल इज्तेमा(धर्मसभा) पाहत आहात. यात लाखो मुस्लिमांनी विश्व शांतीसाठी प्रार्थना केली. रविवारी तीन दिवसांचे'विश्व इज्तेमा'चा तिसरा टप्पा होता.
150 देशांमधून आले शिया पंथीय मुस्लिम...
- एका अहवालानुसार, ढाकाच्या टोंगीमध्ये तुराग नदीजवळ यंदा 150 देशांमधून 20 लाख शिया पंथीय मुस्लिम प्रार्थना करण्यासाठी आले आहेत.
- प्रथमच बांगलादेशी मुस्लिमांना चार टप्प्यात भाग घ्यायला विनंती केली आहे.
- सूत्रांच्या माहितीनुसार, हजनंतर बांगलादेशात मोठ्या संख्येने मुस्लिम जमा होतात.
- इज्तेमाचा दुसरा टप्पा 15 जानेवारीपासून होईल.
कशी आहे सुरक्षा व्यवस्था?
- दहशतवादाच्या सावटामुळे प्रार्थना स्थळी 5 हजार पोलिस तैनात केली गेली आहेत.
- या व्यतिरिक्त 60 सीसीटीव्ही कॅमेरे आणि अनेक सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात आली आहे.
जीव धोक्यात टाकत आहेत लोक
- ढाकातून जी छायाचित्रे समोर आली आहे, त्यात लोक जीव मुठीत घेऊन रेल्वेच्या छतावर बसून प्रवास करताना दिसत आहे.
- एका छायाचित्रात तर एका रेल्वेच्या छतावरुन दुस-या रेल्वेच्या छतावर उडू मारतानाचे दृश्य पाहावयास मिळत आहे.
पृथ्वीवर तेव्हा होती मुस्लिमांची सर्वात मोठी संख्या
- 2010 मध्ये इज्तेमाच्या दरम्यान जगाच्या पाठीवर मुस्लिमांची सर्वाधिक संख्या ढाक्यात होती.
- वृत्तानुसार तेव्हा 50 लाख मुस्लिमान सहभागी होते.
इज्तेमा म्हणजे काय?
- इज्तेमा हा अरबी भाषेतला शब्द आहे. त्याचा अर्थ एकत्र होणे असा होतो.
- हा शब्द अशा सभेसाठी वापरला जातो जिथे धर्माच्या भल्यासाठी आणि प्रसार-प्रचाराबाबत चर्चा केली जाईल.
- मध्य प्रदेशमधील भोपाळ, पाकिस्तानमधील लाहोरजवळील रायविंड आणि बांगलादेशची राजधानी ढाकाजवळील टोंगीमध्ये सर्वात मोठ्या इज्तेमाचे आयोजन केले जाते.
बांगलादेशमध्ये होत असलेल्या विश्व इज्तेमात सहभागी होण्यासाठी रेल्वेच्या छतांवर बसून मुस्लिम बांधव प्रवास करत आहेत.
पुढील स्लाइड्सवर पाहा बांगलादेशमधील विश्व इज्तेमाचे छायाचित्रे....