आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात गेल्या वर्षी दर मिनिटाला सुमारे 60 लोक झाले विस्थापित, भारत तिसऱ्या क्रमांकावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंगटन - आपत्ती, संघर्ष आणि हिंसाचारामुळे घर सोडावे लागलेल्या लोकांच्या प्रकरणांत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीन पहिल्या आणि फिलिपाइन्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. अंतर्गत विस्थापनाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सोमवारी जारी झालेल्या अहवालानुसार २०१६ मध्ये भारतात सुमारे २८ लाख लोक विस्थापित झाले.
 
त्यात ४ लाखांपेक्षा जास्त लोकांना संघर्ष आणि हिंसेमुळे तर २४ लाख लोक आपत्तींमुळे विस्थापित झाले. अहवालात म्हटले आहे की, ‘भारताची आर्थिक वृद्धी आणि सामाजिक सुरक्षा प्रणालीत सुधार करण्याचे प्रयत्न सामाजिक समूह आणि लोकांदरम्यान असमानता कमी करण्यात अपयशी ठरले.

देशात सध्या ४० कोटींपेक्षा जास्त विस्थापित
२००१ च्या जनगणनेनुसार भारतात अंतर्गत विस्थापितांची संख्या ३०.९ कोटींपेक्षा जास्त होती. त्यात सुमारे ९०% महिला आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार भारतात अंतर्गत विस्थापितांची संख्या ४० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. एका अंदाजानुसार, १० पैकी प्रत्येक तिसरा भारतीय अंतर्गत विस्थापनाच्या काळातून जात आहे. जगात दरमिनिटाला ६० लोक विस्थापित होतात.

देशात सर्वात जास्त विस्थापन यूपी, बिहारमधून
देशात सर्वाधिक अंतर्गत विस्थापन उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा आणि उत्तराखंडमधून झाले आहे. त्यांची सर्वाधिक लोकसंख्या राजधानी दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, पंजाब आणि कर्नाटकमध्ये विस्थापित झाली आहे. त्याचा एक ट्रेंडही दिसतो. उदा : बिहारमधून दिल्ली-एनसीआर, यूपीतून महाराष्ट्र व गुजरात, ओडिशातून गुजरात. भारतात असमानता दूर करण्यात आर्थिक सुधारणांना अपयश हे विस्‍थापनामागील मुख्‍य कारण आहे.
बातम्या आणखी आहेत...