आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांनो, काही मिळाले नाही तर ससे खा; व्हेनेझुएलात अन्न तुटवड्याचे संकट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅराकस- व्हेनेझुएलात अन्नानदशा निर्माण झाली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून निकोलस मदुरो सरकारने नागरिकांना तूर्त काहीच मिळत नसल्यास ससे खा. सशामध्ये किमान दोन-अडीच किलो मांस असते, असा सल्ला दिला आहे.

देशातील अन्न तुटवड्याची समस्येवर मदुरो सरकारने मार्ग काढण्याऐवजी असा सल्ला दिला आहे. ससे हे अतिशय गोड पाळीव प्राणी असतात, असे आपल्याला शिकवले जाते. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या आपल्याला ससा खाणे अयोग्य वाटू लागते. पण ससा हा काही पाळीव प्राणी नाही. उलट त्यात अडीच किलोपर्यंतचे मांस असते. त्यात मोठ्या प्रमाणात प्रथिनेही मिळतात. कोलेस्ट्रॉलची देखील चिंता नाही, असे कृषी मंत्री फ्रिडी बर्नल यांनी टीव्हीवरून दिलेल्या संदेशात म्हटले आहे.वास्तविक अमेरिकेच्या तुलनेत युरोपात ससे खाणे सामान्य आहे. ते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. व्हेनेझुएलात मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात सशांची उपलब्धता होणे कठीण आहे, असे टीकाकारांचे म्हणणे आहे.
 
सरकारवर टीका
व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेते हेनरिक कॅप्रिल्स यांनी या प्रश्नी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. त्यांनी एक व्हिडिआे संदेश पाठवून मदुरो सरकारला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. जनतेने आता अन्न संकटाची समस्या सोडवण्यासाठी ससे खाण्यास सुरुवात करावी, असे तुम्हाला वाटते का ? तुम्ही या प्रश्नी गंभीर आहात का ? असे प्रश्न कॅप्रिल्स यांंनी विचारून टीका केली आहे.
 
इंधनावर आधारित अर्थव्यवस्था
व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था इंधनावर अवलंबून आहे. त्यावर आधारित सामाजिक व्यवस्था आधारित आहे. कच्च्या तेलाची बाजारपेठ कोसळल्यानंतर देशाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात अन्न तुटवड्याची सर्वात भीषण समस्या आहे.  वास्तविक देशाचे इंधानाधारित अर्थव्यवस्थेचे मॉडेल पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. त्यात अलीकडेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध घातले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...