आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incredible Moment British Safari Guide Was Saved From Leopard

...आणि अचानकच बिबट्याने टुरिस्ट गाईडवर केला हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टूरिस्ट गाईडचा हात जबड्यात बिबट्याने धरला आहे. - Divya Marathi
टूरिस्ट गाईडचा हात जबड्यात बिबट्याने धरला आहे.
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेच्या क्रुगर नॅशनल पार्कमध्‍ये एक ब्रिटिश सफारी गाईड बिबट्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता. घटनेच्या वेळी 38 वर्षांचा गाईड कर्टिस प्लंब खुल्या जीपमध्‍ये होता. जीपमध्‍ये इतरही पर्यटक होते. ती छायाचित्रे घेत होती. तेव्हाच अचानक बिबट्याने प्लंबचा हात जबड्यात घेतो. यानंतर त्या जीपबरोबर असलेल्या कार थांबले. मात्र तोपर्यंत बिबट्या झुडपांमध्‍ये पळून गेला. हॉस्पिटलमध्‍ये प्लंबवर उपचार चालू असून त्याची स्थिती सुधारत आहे.
घटनेचा साक्षीदार असलेल्या ग्रांट फोर्ड व त्यांच्या 13 वर्षांच्या मुलाने छायाचित्रे कॅमे-यात कैद केली आहेत. प्लंबने पर्यटकांना बिबट्या दाखवण्‍यासाठी गाडी बंद केली होती, असे फोर्ड याने सांगितले. यामुळे बिबट्या सावध झाला आणि काही सेकंदातच त्याने प्लंबच्या बाजून उडी घेतली. फोडे पुढे म्हणतो, या घटनेने गाडीतील सर्व पर्यटक खूप घाबरले होते. तरीही त्यांनी कॅमे-याच्या साहाय्याने बिबट्याला पळून लावण्‍याचा प्रयत्न केला.

प्लंबला वाचवायला पर्यटकांनी कारचा दरवाजा बिबट्याला मारला. तरीही त्याचा परिणाम झाला नाही. काही सेकंदात प्लंब कसा तरी जीपचा रिव्हर्स गीयर टाकण्‍यात यशस्वी ठरला. असे असताना बिबट्या पराभव मान्य करायला तयार नव्हता. तो गाडीच्या बाजूने धावत होता. शेवटी प्लंबने बिबट्यावर जीप घातली. यानंतर ह्युंदाई कारनेही बिबट्याला हिसक दिला, तेव्हा कुठे त्यांने धूम ठोकली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...