आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1965 : पाकच्या घुसखोरीनंतर भारताने लाहोरमध्ये घुसून फडकावला होता तिरंगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धात नौदलानेही महत्त्वाची भूमिका निभावली होती. सहा सप्टेंबर 1965 ला कमांडर एस.एस. अन्वर यांच्या नेतृत्‍वात पाकिस्तानी नेव्हीच्या एका टीमने द्वारका येथील नौदलाच्या रडार स्टेशनवर बॉम्ब हल्ला केला होता. अगदी संसदेपर्यंत त्याचा आवाज घुमला होता. त्यामुळेच संरक्षण क्षेत्राचे बजेट 35 कोटींवरून 115 कोटी करण्यात आले.

पाकिस्‍तानच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्‍तानी नेव्हीची एक पाणबुडी पीएनएस गाझीने भारतीय नौदलाचे विमानवाहू INS विक्रांतला संपूर्ण युद्धादरम्यान बॉम्बने घेरलेले होते. भारतीय सुत्रांनी दावा केला होता की, भारताला पाकिस्तानच्या विरोधात केवळ भूभागापर्यंत मर्यादीत युद्ध हवे होते. त्यांना नौदलाचा या युद्धात समावेश नको होता.

पाकचे गुप्त ऑपरेशन
पाकिस्‍तानी लष्कराने भारतीय एअरबेसमध्ये घुसखोरी केली आणि ते उध्वस्त करण्यासाठी अनेक गुप्त योजना आखल्या. 7 सप्टेंबर 1965 ला स्पेशल सर्व्हीसेस ग्रुपचे कमांडो पॅराशूटद्वारे भारतीय हद्दीत घुसले. पाकिस्‍तानी आर्मीचे चीफ ऑफ आर्मी स्‍टाफ जनरल मुहम्‍मद मूसा यांच्यामते सुमारे 135 कमांडो भारताच्या तीन एअरबेस (हलवारा, पठाणकोट आणि आदमपूर) वर उतरले. मात्र त्याची मोठी किंमत पाकिस्तानी लष्कराचा चुकवावी लागली. त्यांचे केवळ 22 कमांडोच परत जिवंत पाकिस्तानात पोहचू शकले. 93 पाकिस्तानी सैनिकांना बंदी बनवण्यात आले. त्यात एका ऑपरेशनचा कमांडर मेजर खालिद बट्ट याचाही समावेश होता. पूर्वतयारीमध्ये असलेल्या कमतरतांमुळे पाकिस्तानला हे अपयश आल्याचे सांगितले जाते.

भारताने असे दिले प्रत्युत्तर
एवढ्या मोट्या अपयशानंतरही पाकिस्तानच्या या मोहिमेनंतर भारताच्या काही ऑपरेशनवर परिणाम झाल्याचा पाकिस्तानचा दावा होता. भारतीय लष्कराच्या 14 व्या इन्‍फ्रंट्री डिव्हीजनला पॅराट्रूपर्सना पकडण्यासाठी डायव्हर्ट करण्यात आले. तर पाकिस्तानी हवाई दलाने भारतीय सैनिकांच्या अनेक वाहनांवर हल्ला केला.पाकिस्तानच्या या मोहिमेचे भारतानेही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले असून त्यांनी पाकिस्तानात कमांडो पाठवले आहे, असे वृत्त यादरम्यान पाकिस्‍तानमध्ये पसरले.

पुढील स्लाइड्सवर वाचा, लाहोरमध्ये घुसून भारतीय लष्कराने फडकावला होता तिरंगा...