आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-बांगलादेशदरम्यान द्विपक्षीय बैठक आजपासून; म्यानमारशी सौहार्दपूर्ण चर्चा झाली : बांगलादेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- रोहिंग्या विस्थापित भारतीय चलनातील बनावट नोटांची तस्करी करत आहेत. शिवाय अमली पदार्थांच्या तस्करीतही त्यांना वापरण्यात येत आहे. या समस्येतून तोडगा काढण्यासाठी भारत-बांगलादेश द्विपक्षीय चर्चा होणार आहे. सीमा सुरक्षा दलाच्या प्रमुखांदरम्यान याविषयी सीमावर्तीय भागात चर्चा होणार आहे. या चर्चेला मंगळवारपासून सुरुवात होईल.  बॉर्डर गार्ड बांगलादेश (बीजीबी) चे महासंचालक मेजर जन. अब्दुल हुसेन यासाठी बांगलादेशाचे प्रतिनिधित्व करतील, तर भारताचे प्रतिनिधित्व सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख के. के. शर्मा करणार आहेत.  

महासंचालक स्तरावरची ही बैठक असेल. ५ ऑक्टोबरपर्यंत या वाटाघाटी पूर्ण होतील. सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणात बनावट चलनी नोटा येत असल्याचा भारताचा आरोप आहे. सीमेवरील इतर गुन्हे, मानवी तस्करी, पशुधनाची तस्करी, अवैध घुसखोरी या प्रमुख विषयांवर ही चर्चा होणार आहे. गेल्या फेब्रुवारीमध्ये सीमा सुरक्षा दलाचे प्रतिनिधी मंडळ बांगलादेशात चर्चेसाठी गेले होते. 

रोहिंग्यांच्या परतीसाठी प्रस्ताव सादर  
म्यानमारने रोहिंग्यांच्या परतीसाठी प्रस्ताव तयार केला आहे. हजारो रोहिंग्यांची सुरक्षित परती केली जाईल, असे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. सोमवारी म्यानमारच्या प्रतिनिधींशी उच्चस्तरीय चर्चा झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. म्यानमारशी झालेली चर्चा मैत्रीपूर्ण व तणावरहित झाल्याचे परराष्ट्रमंत्री ए. एच. मोहंमद अली यांनी सांगितले.

या वर्षी २ दशलक्ष नवे विस्थापित 
म्यानमार, द. सुदान, सिरिया आणि इतर देशांतून या वर्षी एकूण २ दशलक्ष नवे विस्थापित निर्माण झाले आहेत. २०१६ च्या अखेरीपर्यंत जगभरात ६५.६ दशलक्ष विस्थापित होते. पैकी २२.५ दशलक्ष नोंदणीकृत आहेत. ऑगस्टपासून रोहिंग्यांसह द. सुदानमधून ५० हजार लोकांनी स्थलांतर केले. सिरियातून तर गेल्या ४ वर्षांपासून प्रचंड प्रमाणात लोकांनी युरोप, आफ्रिकेत स्थलांतर केले आहे.  
बातम्या आणखी आहेत...