आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्‍मीरचा नकाशा चुकीचा दाखवल्याने \'अल-जजीरा\'वर भारतात पाच दिवस बंदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : काश्‍मीर राज्याचा चुकीचा नकाशा 'अल जजीरा' या इंग्रजी वृत्तवाहिनीने दाखल्याने भारतात वाहिनीचे पाच दिवस प्रसारण बंद करण्‍यात आले आहे.वृत्त वाहिनी नेहमी काश्‍मीरचा चुकीचा नकाशा दाखवत होती.यामुळे नाराज झालेल्या भारतीय म‍ाहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कारवाई केली आहे.मंत्रालयाच्या अधिका-यांनुसार वाहिनीने काश्‍मीरचा हिमालयीन भाग पाकिस्तान आणि चीनमध्‍ये दाखला होता. हा खूप संवेदनशील प्रकरण आहे. त्या अधिका-याने सांगितले, की मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर अल-जजीरा वृत्तवाहिनीवर पाच दिवसांकरिता बंदी घालण्‍यात आली आहे.