आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅकीत भारताचे पाकला सडेतोड उत्तर, अाशिया चषक हाॅकी; भारताचा ३-१ ने विजय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - सीमारेषेवर भारत-पाकिस्तान या दोन देशांत वातावरण तापलेले असताना इकडे खेळाच्या मैदानात भारतीय हॉकी संघाने पाकिस्तानला धडा शिकवला.भारताने गुरुवारी १८ वर्षांखालील चाैथ्या अाशिया चषक हाॅकी स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली. भारताने उपांत्य सामन्यात पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताने ३-१ अशा फरकाने सामना जिंकला. शिवम अानंद (७ मि.), दिलप्रीत सिंग (३२ मि.) अाणि नीलम संजीप (४६ मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. सामन्याच्या ६३ व्या मिनिटाला अमजद अलीने पाकिस्तान टीमकडून एकमेव गाेल केला. मात्र, त्याला टीमचा पराभव टाळता अाला नाही. इतर सर्वच खेळाडूंनी भारतासमाेर नांग्या टाकल्या.
भारताने दमदार सुरुवात करताना सातव्या मिनिटाला सामन्यात अाघाडी मिळवली. शिवम अानंदने भारताकडून गाेलचे खाते उघडले. त्यानंतर दिलप्रीत सिंगने सामन्यात भारताकडून दुसऱ्या गाेलची नाेंद केली. त्याने ३२ व्या मिनिटाला टीमच्या अाघाडीला २-० ने मजबूत केले. दरम्यान, पाकने गाेलसाठी केलेेले प्रयत्न भारताच्या गाेलरक्षकाने हाणून पाडले.
भारत-बांगलादेश अाज फायनल
अाशिया चषकासाठी शुक्रवारी भारत अाणि यजमान बांगलादेश यांच्यात फायनल हाेणार अाहे. भारताने पाकला नमवून अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे यजमान बांगलादेश संघानेही सरस कामगिरीच्या बळावर फायनलमध्ये धडक मारली.
क्रीडामंत्र्यांकडून युवा टीमवर काैतुकाचा वर्षाव
भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान टीमला पराभवाची धूळ चारली. यासह युवा टीमने अंतिम फेरीत प्रवेश केला. या कामगिरीमुळे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गाेयल यांनी भारताच्या युवा टीमवर काैतुकाचा वर्षाव केला. त्यांनी टि्वट करून टीमचे खास अभिनंदन केले.
बातम्या आणखी आहेत...