आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकेश अरोरा यांना ८६४ कोटींचे पॅकेज; सॉफ्टबँकेचे एका वर्षात अध्यक्ष बनले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- भारतीय वंशाच्या निकेश अरोरा यांना जपानची टेलिकॉम कंपनी सॉफ्टबँकने अध्यक्ष केले आहे. ते सध्या उपाध्यक्षपद आहेत. कंपनीने त्यांना गेल्यावर्षी १३.५ कोटी डॉलर्सचे (८६४ कोटी रुपय) पॅकेज दिले. यात सायनिंग बोनसचाही समाविष्ट आहे.

शुक्रवारी कंपनीच्या शेयरधारकांच्या बैठकीत अरोरांच्या पदोन्नतीचाचा निर्णय झाला. अध्यक्षपदासह त्यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) पदाची जबाबदारीही देण्यात आली. सॉफ्टबँकेचे चेयरमन व सीईओ मासायोशी सोन यांनी आधीच ४७ वर्षीय अरोरांना संभाव्य उत्तराधिकारी म्हणत ‘उगवता तारा’ या शब्दांनी संबोधले होते.

निकेश अरोरा यांनी गेल्या सप्टेंबरमध्ये सॉफ्टबँक जाॅइन केली. त्याच्याआधी ते सुमारे वर्षे गुगलमध्ये होते. गुगल सोडताना ते वरिष्ठ उपाध्यक्ष आणि चीफ बिझनेस ऑफिसर होते. आयआयटी-बीएचयूतून त्यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगची पदवी घेतली. यानंतर बोस्टन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सिटी, बोस्टन येथून त्यांनी एमबीए केलेले आहे.
एकेकाळी हिणवले होते : तुम्हाला फायनान्समध्ये काहीही कळत नाही

> निकेश यांचे यश यासाठी उल्लेखनीय की, तुम्हाला फायनान्सचे काहीही कळत नाही, असे त्यांना हिणवण्यात आले होते. निकेश म्हणाले, ग्रॅज्युएशन केल्यानंतर सहज नोकरी मिळाली नाही. मी ४०० पेक्षा जास्त लोकांना रेझ्यूमे पाठवला. मात्र तुम्हाला फायनान्समधले काही कळत नाही, हेच उत्तर प्रत्येकाकडून आले.

> सॉफ्टबँकेत त्यांनी वर्षाच्या आतच १.६७ अब्ज डॉलर्सपेक्षा (१०,७०० कोटी रुपये) जास्त डील केलेल्या आहेत. यात भारतीय ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडील आणि ओला कॅब्जमधील गुंतवणुकीचा समावेश आहे.

>२०१२ मध्ये गुगलमध्ये काम करताना निकेश हे कंपनीत सर्वाधिक वेतन मिळवणारे कर्मचारी होते. कंपनीत ४ नंबरच्या उच्चपदावर असताना त्यांना ३१० कोटींचे पॅकेज होते. ऑक्टोबर २००४ मध्ये गुगलने नियुक्ती केली तेव्हा ते कंपनीचे अमेरिकेबाहेरचे पहिलेच उपाध्यक्ष होते.

> निकेश यांना फिडेलिटी इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिली नोकरी मिळाली. नंतर ते डाएश्च टेलिकॉम, टी-मोबाइल, यूएसए, भारती एअरटेलसारख्या कंपन्यांत गेले. यानंतर गुगलने त्यांची कंपनीत घेतले. यानंतर गुगल सोडून ते सॉफ्टबँक कंपनीत दाखल झाले.
बातम्या आणखी आहेत...