आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशाचे सुंदर पिचाई गुगलचे CEO, कंपनीने दिले होते 305 कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया - गुगलने कंपनीमध्ये मोठा फेरबदल करत भारतीय वंशाच्या सुंदर पिचाई यांना CEO बनवण्याची घोषणा केली आहे. एकेकाळी गुगलचे प्रोडक्ट चीफ राहिलेल्या सुंदर यांनी आयआयटी खरगपूरमधून इंजिनीअरींगची पदवी घेतली आहे.
चेन्नईमध्ये जन्मलेले सुंदर गेल्या 11 वर्षांपासून गूगलशी संलग्न आहेत. सोबतच जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलने अल्फाबेट इंक नावाची एक नवी कंपनी सुरू केली असून आता गूगल त्याअंतर्गतच काम करणार आहे. 2011 मध्ये mensxp.com ची ऑफर मान्य करून नोकरी सोडू नये म्हणून गुगलने त्यांना 305 कोटींचा बोनस देऊन थांबवले होते. त्यावरून गुगलमध्ये त्यांचे महत्त्व लक्षात येते.

को-फाऊंडरने ब्लॉग पोस्टकरून दिली माहिती
गुगलचे को-फाऊंडर लॅरी पेज यांच्या ब्लॉगनुसार गूगल आता 'स्लिम्ड डाऊन' कंपनी बनली असून ती Alphabet Inc चा एक भाग असेल. सुंदर पिचाई हे गुगलला अधिक क्लीन आणि जबाबदार बनवतील असे पेज म्हणाले. अल्फाबेटची जबाबदारी पेज सीईओ आणि गुगलचा को-फाऊंडर सेर्गे ब्रिन प्रेसिडेंट म्हणून सांभाळतील.

कोण आहेत सुंदर पिचाई
सुंदर पिचाई हे टेक वर्ल्डमध्ये मोठे नाव आहे. ते गेल्या 11 वर्षांपासून गुगलमध्ये काम करत आहेत. चेन्नईमध्ये जन्मलेल्या सुंदर पिचाई यांनी गूगलमध्ये सिनियर व्हाइस प्रेसिडेंट (अँड्रॉइड, क्रोम आणि अॅप्स डिव्हीजन) ची जबाबदारी स्वीकारलेली आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीचे नवे प्रोडक्ट चीफ बनले होते. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलपमेंटमध्ये त्यांची मोठी भूमिका राहिली आहे.

टेक वर्ल्डमध्ये भारतीयांची चलती
सुंदर यांना गुगलने सीईओपदी नियुक्त केल्यानंतर जगातील प्रमुख सॉफ्टवेयर कंपन्यांमध्ये भारतीय वंशाच्या लोकांची चलती असल्याचे दिसत आहे. यापूर्वी मायक्रोसॉफ्टने भारतीय वंशाच्या सत्या नडेला यांनी कंपनीची जबाबदारी सोपवली आहे.
गुगलकडून मिळाले होते 50 मिलियन डॉलर (305 कोटी) )
mensxp.com ने दिलेल्या माहितीनुसार, ट्विटरने 2011 मध्ये पिचाई यांना नोकरीची ऑफर दिली होती, मात्र गुगलने त्यांना 50 मिलियन डॉलर (जवळपास 305 कोटी रुपये) देऊन थांबवून घेतले.

पुढील स्लाईडवर वाचा, सुंदर पिचाई यांच्या प्रवासाबाबत...