आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Brain Drain Is Not Brain Gain Prime Minister

भारत \'ब्रेन ड्रेन नव्हे, ब्रेन गेन\' होतोय : देशासाठी आयुष्य समर्पित - पंतप्रधान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन होजे- २१ वे शतक भारताचे असल्याचे सांगत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सव्वाशे कोटी देशवासीयांची संकल्पशक्ती आणि वचनबद्धतेमुळे हे परिवर्तन घडल्याचा विश्वास व्यक्त केला. सॅन होजेच्या सॅप सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात मोदींनी भारतीय समुदायासमोर भाषण केले. ब्रेन ड्रेन (बौद्धिक प्रतिभेचे स्थलांतर) कधी ब्रेन गेन (बौद्धिक लाभ) होऊ शकेल, याची कोणी कल्पनाही केली नसेल, असे पंतप्रधानांनी या वेळी सांगितले.

आपण १६ महिन्यांच्या कार्यकाळात प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. आता मला तुमच्याकडून प्रमाणपत्र हवे आहे. देशवासीयांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी शरीराचा कणन् कण आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण देईन, असे आश्वासन त्यांनी दिले.

मोदी म्हणाले, भारतातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिल्यानंतर मोदींनी या विश्वासाच्या बळावरच भारत मागे राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. आज ब्रिक्समध्ये आज जर कोणी खंबीरपणे उभे असेल तर ते आय (इंडिया) आहे. १५ महिन्यांत विकासाच्या नव्या पुढाकारामुळे परिस्थिती बदलली आहे. आज जागतिक बँक, आयएमएफ, मुडीज व अन्य रेटिंग देणाऱ्या संस्थांनी भारताला वेगाने विकसित होणारा देश ठरवला आहे.

भगतसिंगांचे स्मरण
मोदी यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनावेळी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गदर पार्टीचे योगदान आणि भगतसिंग यांच्या जयंतीच्या स्मृती जागवत म्हटले की, कॅलिफोर्नियाचा भारताशी ऐतिहासिक संबंध आहे. भारताच्या विकासातही त्याचे योगदान राहिले आहे. २८ सप्टेंबर रोजी शहीद भगतसिंग यांची जयंती असते. यानिमित्त आपण त्यांना वंदन करत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, सुरुवातीस उपनिषदाबाबत बोलले तर लोकांना समजत नसे. मात्र, आता उपनिषदापासून उपग्रहापर्यंत बोलत आहोत. मंगळ मोहीम याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. पहिल्या प्रयत्नातच या मोहिमेला यश मिळाले. अन्य देशांना अनेकदा प्रयत्न करावे लागले.
भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची वचनबद्धता
पंतप्रधान मोदी म्हणाले, आमच्या देशात राजकीय नेत्यांवर काही दिवसांतच आरोप लावले जातात. आम्ही एखाद्या नेत्याने ५० कोटी कमावल्याचे, कुणा मुलाने १०० कोटी, कोण्या मुलीने २५० कोटी, तर जावयाने १००० कोटी रुपये कमावल्याचे ऐकले आहे. यामुळे भ्रष्टाचाराविरुद्ध चीड येते. माझ्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही.

सात सामंजस्य करार
भारतातील स्टार्टअप्स बळकट करण्यासाठी सात सामंजस्य करार करण्यात आले.भारत-अमेरिका स्टार्टअप कनेक्ट २०१५ कार्यक्रमात पंतप्रधानांनी सहभाग घेतला. यामध्ये सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉल्यूक्यूलर प्लॅटफॉर्म आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट फॉर क्वान्टिटेटिव्ह बायोसायन्समध्ये करार झाला.