आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय कंपन्यांमध्ये ९१ हजार अमेरिकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारतातील १०० बड्या कंपन्यांनी अमेरिकेच्या ३५ राज्यांत विविध क्षेत्रांत १५ अब्ज अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करून ९१ हजारांहून अधिक लोकांना रोजगार दिला असल्याची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे.
भारतीय उद्योग संघ (सीआयआय) आणि ग्रँट थॉर्नटनच्या (जीटी) इंडियन रुट्स, अमेरिकन साॅइल शीर्षकाच्या अहवालात म्हटले की, भारतीय कंपन्यांनी न्यूजर्सीमध्ये ९३००, कॅलिफोर्नियात ८४००, टेक्सासमध्ये ६२००, इलिनोइसमध्ये ४,८०० आणि न्यूयॉर्कमध्ये ४,१०० लोकांना नोकऱ्या दिल्या. दक्षिण टेक्सास राज्यात भारतीय कंपन्यांनी सर्वाधिक तीन अब्ज ८४ कोटी डॉलरची विदेशी गुंतवणूक केली. यानंतर पेन्सिल्व्हेनियामध्ये तीन अब्ज ५६ कोटी डॉलर, मिनिसोटामध्ये एक अब्ज ८० कोटी डॉलर, न्यूजर्सीमध्ये एक अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतीय कंपन्यांनी केली आहे. सिनेट इंडिया कॉकसचे उपाध्यक्ष सिनेटर वॉर्नर म्हणाले, अमेरिकेत प्रत्यक्ष गुंतवणूक करणाऱ्या देशांत भारत चौथ्या स्थानी आहे.
चौथा देश होणार आहे. अशा स्थितीत भारतीय वाणिज्य गुंतवणुकीचा सकारात्मक प्रभाव जाणून घेणे आवश्यक ठरले आहे. सर्वाधिक गुंतवणूक माहिती तंत्रज्ञान आणि त्यासंबंधी क्षेत्रात झाले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...