आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘घनींचे पाकविरोधी भाषण भारताला खुश करण्यासाठी’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/अमृतसर : पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे विशेष सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटले आहे की भारताने कितीही प्रयत्न केले तरीही पाकिस्तान - अफगाणिस्तान संबंध खराब करण्यात त्याला यश येणार नाही. अमृतसरहून पाकिस्तानात परतताच विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी अफगाण राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांच्या पाक विरोधी भाषणाविषयी म्हटले की ते केवळ भारताला खुश करण्यापुरते होते.

अशरफ घनी म्हणाले होते की पाकिस्तान जी आर्थिक मदत अफगाणिस्तानला देऊ इच्छित आहे त्यांनी ती दशतवादाचा खात्मा करण्यावर खर्ची घालावी. घनी यांचे वक्तव्य खेदजनक होते असे सरताज अजीज म्हणाले. अफगाणिस्तानातील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याचाच हा परिणाम आहे. भारत स्वार्थासाठी अफगाणिस्तानचा वापर करत असल्याचा आरोप सरताज यांनी केला.

हार्ट ऑफ अाशियामध्ये सहभागी पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाशी भारतीय माध्यमे आणि सरकारचे वागणे उचित नव्हते. त्यांना पत्र परिषद घेऊ दिली गेली नाही. सुवर्णमंदिराच्या भेटीसदेखील मज्जाव करण्यात आल्याचे सरताज म्हणाले. आपल्या देशांतील माध्यम प्रतिनिधींची भेट घेण्याची आपली इच्छा होती. मात्र त्यावरही निर्बंध होते.

आम्ही आतिथ्यात कसर सोडली नाही : नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाने सरताज अजीज यांच्या आरोपांचे खंडन केले. त्यांच्या अातिथ्यात कोणतीही कसर सोडली नाही. इतर अतिथींपेक्षा त्यांना विशेष वागणूक देण्यात आली. जवळपास सर्व आैपचारिक स्थळांच्या ठिकाणी पाकिस्तानचे प्रतिनिधी मंडळ उपस्थित होते.

बुलेटप्रूफ गाड्या केवळ पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाला पुरवण्यात आल्या. ठरलेल्या वेळेच्या १२ तास आधी येऊन देखील त्यांच्या विमानाला क्लिअरन्स दिले गेले. पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या भोजन समारंभात त्यांना उपस्थित राहता यावे यासाठी ही सुविधा केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. सुवर्णमंदिरात जायचे होते, पण परवानगी मिळालीनाही, असे अजिज यांनी म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...