आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात १.७३ कोटी अतिवजनाची मुले; २०२५ पर्यंत जगभरात २६ कोटी मुले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - पालकांनी आपल्या मुलांमध्ये अतिवजनाची समस्या निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याची वेळ आली आहे. कारण २०२५ पर्यंत ही समस्या आणखी गंभीर होईल. त्यामुळे सुमारे २६ कोटी ८ लाख मुले अनारोग्याला बळी पडण्याची भीती आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. भारतात अति वजनाच्या मुलांची संख्या १.७३ कोटींच्या घरात असेल. चीनमध्ये ४.८५ कोटी संख्या असेल.
भारतासह सर्वच देशांत सरकारची धोरणे लहान मुलांमधील या समस्येच्या निराकरणावर अद्याप प्रभावी ठरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. जागतिक आेबेसिटी डे च्या पार्श्वभूमीवर वर्ल्ड आेबेसिटी फेडरेशनने एक अहवाल जारी करून समस्येचे गांभीर्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे. वय ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचा त्यात अभ्यास करण्यात आला. स्थूलपणातून निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांचा वेध या अभ्यासातून घेण्यात आला आहे. बालपणीच आलेल्या लठ्ठपणामुळे मुलांमध्ये अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे मुले निरोगी राहू शकत नाहीत. २६ कोटी मुलांमध्ये ९ कोटींहून अधिक मुले लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त असतील, असा इशाराही अहवालातून देण्यात आला आहे. खरे तर हे भाकीत खोटे ठरले तरच बरे होईल. हीच आमचीही अपेक्षा आहे. लहानपणी असलेल्या लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करून चालत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चीननंतर भारताचा क्रमांक लागतो.
बातम्या आणखी आहेत...