आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Saved 1.70 Lakh Citizens After Permission Of Saddam

Airlift : सद्दामच्या परवानगीनंतरच वाचवता आले 1.70 लाख भारतीयांचे प्राण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांना काढण्यासाठी इंडियन एअरलाइन्सने एअर रेस्क्यू ऑपरसेशन राबवले होते. - Divya Marathi
कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांना काढण्यासाठी इंडियन एअरलाइन्सने एअर रेस्क्यू ऑपरसेशन राबवले होते.
1990 मध्ये गल्फ वॉरदरम्यान कुवेतमध्ये अडकलेल्या 1 लाख 70 हजार भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी भारत सरकारने मोहीम राबवली होती. इंडियन एअरलाइन्सने 59 दिवस 500 फ्लाइट्सच्या मदतीने जगातील सर्वात मोठे एयर रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले होते. आजही हा विक्रम कायम आहे. याच कथेवर आधारित अक्षय कुमारचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

सद्दामच्या हल्ल्याने घाबरून पळाले होते शाही कुटुंब
- तेलासाठी इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनने 1 ऑगस्ट 1990 ला शेजारी असलेल्या कुवेतवर हल्ला केला होता.
- युद्धाची घोषणा होताच इराकची आर्मी आणि नागरिक कुवेतमध्ये घुसले. कुवेत आर्मीनेही अगदी कमी कालावधीत पराभव स्वीकारला होता.
- कुवेतचे शाही कुटुंबही प्राण वाचवण्यासाठी सौदी अरबला पळून गेले होते.
- काही दिवसांनी सद्दामने कुवेतहा इराकचा 19 वा प्रांत असल्याची घोषणा केली होती.
- या सर्व गदारोळात राहणाऱ्या भारतीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे भारत सरकारने भारतीयांची तेथून सुटका करण्याचा निर्णय घेतला.
(तत्कालीन भारतीय राजदूत के.पी. फाबिया यांनी सांगितले की, 1990 मध्ये भारताने दोन कारणांनी इराकने त्यावेळी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला नव्हता. एक म्हणजे भारतीयांच्या जिवाला असलेला धोका आणि दुसरे कारण म्हणजे त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पर्याय शोधायचा होता.)

कसे केले?
- भारतीयांना सुरक्षितपणे त्या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र मंत्री आय. के. गुजराल इराकमध्ये सद्दाम हुसेनला भेटण्यासाठी गेले होते.
- सद्दामने सरकारला भारतीयांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याची परवानगी दिली होती.
- सुरुवातीला लहान मुले आणि महिला, ज्येष्ठ यांना आणण्यासाठी लष्करी एअरक्राफ्टची मदत घेण्यात आली. पण तेवढे पुरेसे नव्हते.
- नंतर एअरलाइन्सच्या कमर्शिअल फ्लाइट्सच्या मदतीने भारतीयांना परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला.
- जॉर्डनची राजधानी अम्मानच्या एका हॉटेलला ऑपरेशनचा बेस बनवण्यात आले.
- लोकांना कुवेतहून अम्मानला जाता यावे म्हणून जॉर्डनच्या सीमा खुल्या करण्यात आल्या.
- 13 ऑगस्टपासून 11 ऑक्टोबर 1990 (59 दिवस) पर्यंत 500 फ्लाइट्सच्या मदतीने इतिहासातील सर्वात अवघड एअर रेस्क्यू राबवण्यात आले.
- त्यानंतरही 10 हजार भारतीयांनी कुवेतमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता.

ऑपरेशनमधील अडचणी...
- कुवेतहून भारतीयांना वाचवून आणणे सोपे काम नव्हते. त्याचे कारण म्हणजे लोकांना आयुष्यभराची कमाई सोडून जाणे मान्य नव्हते.
- लोक त्याठिकाणी असलेल्या धोकादायक वातावरणाकडे दुर्लक्ष करत होते आणि त्याच स्थितीत तेथे राहू इच्छित होते.
- तसेच काही लोकांकडे त्यांना कामावर ठेवणाऱ्या संस्थांनी दिलेली वैध कागदपत्रेही नव्हती.
- त्याचबरोबर कुवेतमधून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचा धोकाही होताच. त्यामुळे भारतीयांना अम्मान एअरपोर्टला येण्यास सांगण्यात आले होते.
- कुवेतच्या विविध भागांमधून आलेले भारतीय अनेकदिवस अम्मानच्या शाळा आणि इमारतींमध्ये थांबले होते.

एअरलिफ्टमधील रंजित कटियाल हे काल्पनिक पात्र
- एअरलिफ्ट चित्रपटात अक्षय कुमारने रंजित कटियाल नावाच्या व्यक्तीची भूमिका केली आहे. पण हे पात्र पूर्णपणे काल्पनिक आहे.
- चित्रपटात या ऑपरेशनमध्ये रंजित कट्यालची महत्त्वाची भूमिका असल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र त्यात काहीही खरेपणा नाही.
- या संपूर्ण ऑपरेशनमध्ये भारत सरकार आणि इंडियन एअरलाइन्सची सुरुवातीपासून अखेरपर्यंत महत्त्वाची भूमिका होती.
- मात्र अक्षयने एका इंटरव्ह्यूमध्ये रंजितचे पात्र खरे असल्याचे सांगितले होते.

रेस्क्यू ऑपरेशननंतरची स्थिती...
या हल्ल्यानंतर अमेरिकासह 38 देश सद्दाम हुसेनच्या विरोधात गेले होते. अमेरिकेने 16 जानेवारी 1991 ला इराकच्या विरोधात 'ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म' ची सुरुवात केली होती. हे युद्ध गल्फ वॉर नावाने ओळखले जाते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, या युद्धाचे काही PHOTOS