आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा परिषदेत नकाराधिकारासाठी भारताने आग्रही राहू नये; अमेरिकेचे घूमजाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वासाठी आता नकाराधिकाराविषयी आग्रही राहू नये. भारताला येथे नकाराधिकार प्रदान करणे शक्य नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. भारताने संयुक्त राष्ट्रात सुधारणा तसेच सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्वाची मागणी केली होती. या मागणीला आतापर्यंत अमेरिकेने समर्थन दिले होते. मात्र भारताने नकाराधिकारासाठी आग्रही राहू नये असे आता अमेरिकेने स्पष्ट केले आहे. नकाराधिकाराचा अाग्रह सोडला तर स्थायी सदस्यत्व देता येईल.  

संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेच्या राजदूत निकी हेली यांनी म्हटले की, रशिया आणि चीन सुरक्षा परिषदेच्या सध्याच्या रचनेत बदल करू इच्छित नाहीत. अमेरिका-भारत मैत्री परिषदेद्वारे आयोजित समारंभात त्यांनी म्हटले की, स्थायी सदस्यत्व मिळणेदेखील मोठी सुधारणाच आहे. सुरक्षा परिषदेतील ५ स्थायी सदस्य राष्ट्रे रशिया, चीन, अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स यांना नकाराधिकार आहे.  

अमेरिका भारत मैत्री परिषदेचे अध्यक्ष स्वदेस चटर्जी यांच्या एका प्रश्नावर हेली यांनी ही टिप्पणी केली. त्यांनी म्हटले की, अमेरिका सुरक्षा परिषदेत सुधारणांसाठी राजी आहे. अमेरिकी काँग्रेस किंवा सिनेटची  सुरक्षा परिषद सुधारणांमध्ये मोठी भूमिका नाही.  

भारताने समर्थन मिळवावे  
भारताच्या मागणीविषयी अमेरिका सकारात्मक आहेच असे निकी हेली म्हणाल्या. मात्र दोन स्थायी सदस्य रशिया, चीन यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यांना सुरक्षा परिषदेत बदल नकोय. हा संयुक्त राष्ट्राच्या अखत्यारीतील मुद्दा आहे. भारताला यासाठी सुधारणा हव्या असतील तर त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायात समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत.  
बातम्या आणखी आहेत...