आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 लाख युवकांना मोफत जपानला पाठवणार मोदी, अशी आहे योजना...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
3 लाख युवकांना जपान जाण्याची संधी... - Divya Marathi
3 लाख युवकांना जपान जाण्याची संधी...
इंटरनॅशनल डेस्क - मोदी सरकारचा हा निर्णय आपले आयुष्य बदलू शकते. सरकारने ऑन जॉब ट्रेनिंगसाठी 3 लाख युवकांची निवड करून त्यांना मोफत जपानला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या कौशल्य विकास योजनेत युवकांना 3 ते 5 वर्षांसाठी जपानला पाठवणार आहे. हे युवक जपानला जाऊन तेथील इंडस्ट्रीज आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेणार आहेत. यासाठी सरकारी तयारी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रशिक्षणाचा खर्च जपान सरकार उचलणार आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबतची माहिती दिली. 
 

जपानला जाणार धर्मेंद्र
कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितल्याप्रमाणे, केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि जपानच्या टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्राम (TITP) ला मंजुरी दिली आहे. 16 ऑक्टोबर रोजी ते तीन दिवसांच्या जपान दौऱ्यावर जात आहेत. त्यावेळी या करारावर स्वाक्षऱ्या होणार आहेत. 
प्रधान यांनी ट्वीट करून दिलेल्या माहितीनुसार, टीआयटीपी एक महत्वाकांक्षी योजना आहे, यात 3 लाख युवकांना जपानमध्ये काम करताना प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे. 3 ते 5 वर्षांपर्यंत चालणाऱ्या या प्रोग्रामसाठी पुढील 3 वर्षांत पाठवले जाईल.
 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, अशी होणार निवड...
बातम्या आणखी आहेत...