आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या युद्धात भारतीय सैनिकांची करण्यात आली होती निर्दयतेने हत्या, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - दुसऱ्या महायुद्धात भारताने सप्टेंबर 1939 मध्ये जर्मनीच्या विरोधात युद्धाची घोषणा केली होती. या युद्धात ब्रिटनतर्फे भारतातील तब्बल दोन लाख सैनिकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये 87 हजाराहून अधिक भारतीय सैनिक शहीद झाले होते. हे सैनिक आफ्रिका, यूरोप आणि आशियाच्या वेगवेगळ्या ठिकाणी लढण्यास गेले होते. त्याचप्रमाणे ब्रिटिश आर्मीसोबत भारतीय सैनिकांची एक तुकडी सिंगापूरमध्ये जापान विरूद्ध लढत असतांना जापानी सैन्यांनी हजारो सैनिकांना बंदी बनवले होते. यामध्ये अनेकांची टॉर्चर करून हत्या करण्यात आली होती.
 
शिक्षा देण्यासाठी अंमलात आणल्या होत्या अनेक पद्धती...
- फोटोमध्ये दिसत असलेले भारतीय सैनिक सिंगापूरमध्ये जापान विरूद्ध लढतांना दिसत आहेत.
- यादरम्यान सिंगापूरला जापाने आपलाच एक भाग बनविले होते.याठिकाणी ब्रिटीशांनी अनेक जवानांना पाठिवले, ज्यात भारतीयांचाही समावेश होता.
- जापानीज सैनिकांकडून हजारो भारतीय सैनिकांची अत्यंत क्रुरतेने हत्या करण्यात आली होती. यामध्ये क्रुरतेने गोळ्या घालण्यापासून ते मुंडके छाटण्यापर्यंतचे प्रकार होते. 
- इतकेच नव्हे तर जापान सैनिक बंदूक चालविण्याच्या सरावासाठी बंधक सैनिकांचाही वापर करायचे.
- बंधक केलेल्या सैनिकांकडून कारखान्यात काम करून घेण्यापासून ते रेल्वे रूळ अंथरविण्यापर्यंतची कामे करून घेण्यात आली.
 
पुढील स्लाईडवर पाहा - या युद्धातील फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...